Wednesday, February 25, 2026
HomeNewsMartahiमित्राच्या सतर्कतेमुळे वाचले नानगावात शेतकऱ्याचे प्राण

मित्राच्या सतर्कतेमुळे वाचले नानगावात शेतकऱ्याचे प्राण

खुटबाव, ता. १९ : नानगाव (ता. दौंड) येथील शेतकरी संदीप गुंड यांचे प्राण मित्रांच्या सतर्कतेमुळे वाचले. गुंड यांचे मित्र सतीश कांबळे व उद्धव गुंड यांनी गुंड यांच्या शेतामध्ये दिलेल्या भेटीमुळे ट्रॅक्टरच्या सीट खालील विषारी घोणस सापाच्या हल्ल्यापासून ट्रॅक्टर चालक गुंड बचावले आहेत. सदर घटना बुधवार (ता. १८) दुपारी घडली.

याबाबत सविस्तर हकिकत अशी की, गुंड हे स्वतःच्या शेतामध्ये ट्रॅक्टरच्या साह्याने काकऱ्या मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी संदीप गुंड यांचे मित्र सतीश नारायण कांबळे आणि शेजारील बांधकारी उद्धव प्रल्हाद गुंड हे त्याठिकाणी आले. मित्रांसोबत बोलण्यासाठी संदीप गुंड हे ट्रॅक्टरवरून खाली उतरले. त्यावेळी कांबळे यांचे लक्ष ट्रॅक्टरवरील सीटच्या मागे डोकावत असलेल्या अतिविषारी घोणस सापाकडे लक्ष गेले. चार फूट लांबीचा घोणस ट्रॅक्टरच्या शीट खालील स्प्रिंगमध्ये अडकला होता.
प्रसंगावधान राखत तिघांनी या सापाला ट्रॅक्टरच्या सीटखालून बाहेर काढले. त्यानंतर गुंड यांनी शेताच्या मशागतीस पुन्हा सुरुवात केली. या घटनेबाबत संदीप पुंड म्हणाले की, अडगळीच्या ठिकाणी लावलेली वाहने चालू करण्यापूर्वी तपासली पाहिजेत. अनेकदा विषारी साप दुचाकी चार, चाकी मोटारीत अडकलेले असतात. शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

Tutorial de trading en gate.io on Insurance Agency Lead Scoring