माझा प्रभाग माझे व्हिजन

माझा प्रभाग – माझे व्हीजन

बार्शी नगरपरिषद

BAR26B13026
काँक्रिटचे रस्ते अन्‌ स्वच्छतेसाठी प्रयत्न
बार्शी : सिमेंट काँक्रिट रस्ता आणि स्वच्छतेसाठी प्रयत्न करणार आहे. माझा प्रभाग हा मुख्यत्वे करून जुना गावठाण भाग आहे; त्या भागात अनेक ठिकाणी जुने डांबरी रस्ते खराब झाले आहेत. काही ठिकाणी सिमेंट काँक्रिटचा रस्ताही केला आहे; परंतु प्रभागातील सर्वच भागात सिमेंट काँक्रिटचे रस्ते देऊन शहर विकासात भर घालण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. तसेच शहरात माझ्या प्रभागातील स्वच्छता आणि कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लागली पाहिजे, यासाठी घंटागाडीचे नियमन दररोज केले जाणार आहे. तरुणांसाठी आणि लहान मुलांसाठी एखाद्या बागेची देखील निर्मिती माझ्या प्रभागात मी करण्याचा प्रयत्न करणार असून, स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न राहणार आहे.
– दीपक राऊत, नगरसेवक, बार्शी नगरपरिषद

BAR26B13024
नियोजनबद्ध विकासातून आदर्श प्रभाग उभारणार
बार्शी : मूलभूत सुविधांमध्ये आमूलाग्र सुधारणा करून प्रभागात आठवडाभर २४ तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. नियोजनबद्ध पाणीपुरवठ्याचा आराखडा, दर्जेदार रस्ते व सिमेंट काँक्रिटची गटारे, एलईडी स्ट्रीट लाइट्स व सुरक्षित वस्ती तसेच शास्त्रोक्त कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता अशी कामे प्राधान्याने करण्याचा मानस आहे. प्राथमिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावणे, डास निर्मूलन व फॉगिंग मशिनद्वारे नियमित फवारणी करून वॉर्डमध्ये स्वच्छता पथक सक्रिय करणे हे देखील ध्येय आहे. शिक्षण व युवा विकासच्या माध्यमातून नगरपरिषद शाळांचा दर्जा सुधारणा, विद्यार्थ्यांसाठी डिजिटल सुविधा, युवकांसाठी क्रीडांगण व वाचनालय आणि पर्यावरणपूरक बार्शी शहर बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणार आहे. प्लास्टिकमुक्त प्रभाग, जलसंधारण व पावसाच्या पाण्याचे साठवण प्रकल्प, तसेच सर्व कामांत नागरिकांचा सहभाग व पारदर्शकता आणणार आहे.
– मुजम्मील पठाण, नगरसेवक, बार्शी नगरपरिषद

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart