महाबीजच्या शिवार फेरीला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद‎:शिवारफेरीतून शेतकऱ्यांना मिळाली विविध रब्बी पीक व वाणांची प्रत्यक्ष माहिती

महाबीजच्या शिवार फेरीला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद‎:शिवारफेरीतून शेतकऱ्यांना मिळाली विविध रब्बी पीक व वाणांची प्रत्यक्ष माहिती
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या पैलपाडा (जि. अकोला) येथील शिवारावर सध्या रब्बी पिके डोलत असून या विविध पिकांची माहिती शेतकऱ्यांना देण्याच्या उद्देशाने आठवडाभर चालणारी शिवारफेरीला नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटीचे आयोजन जिल्हा व्यवस्थापक सुनील दौड यांनी केले होते. या शिवारफेरीचे नुकतेच उद्घाटन झाले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाबीजचे नवनियुक्त संचालक वल्लभ देशमुख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाबीज संचालक डॉ. रणजित सपकाळ, प्रकाश पोहरे उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकात महाबीज संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल लहाने यांनी सांगितले की, राज्यातील शेतकऱ्यांना विविध रब्बी पीक व वाणांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहण्याची संधी मिळावी, यासाठी महाबीज दरवर्षी शिवार फेरी आयोजित करते. अनेक नामवंत संस्थांसोबत करार करून विविध जैविक उत्पादने महाबीजच्या विपणन साखळीत लवकरच समाविष्ट होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. रणजित सपकाळ यांनी महाबीजच्या आर्थिक प्रगतीसाठी शेतकरी, बिजोत्पादक, विक्रेते आणि महाबीज कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले आणि शिवार फेरी उपक्रमाचे कौतुक केले. वल्लभराव देशमुख यांनी महाबीज जैविक उत्पादने मायकोरायझा, मेटाराईझम, व्हर्टीसेलीयम लवकरच उपलब्ध करून दिली जातील आणि भविष्यातही महाबीज शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध राहील, असे सांगितले.याप्रसंगी नेवासा कृषी क्षेत्र अधिकारी नितीन धाटबळे, कोपरगाव कृषी क्षेत्र अधिकारी निलीमा काळे, टाकळीभान येथील शेतकरी सुरेश पवार, जितेंद्र पटारे, रमेश कोकणे, अशोक शिंदे, प्रताप मलीक, रावसाहेब काळे, पांडुरंग काळे, जगदीश गलांडे, शरद जगताप आदींसह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart