भोसले फार्मसी कॉलेजमध्ये आज ”औषध संशोधन” राष्ट्रीय परिषद

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे उद्या (ता. २१) सलग आठव्या वर्षी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचा मुख्य विषय ‘औषध संशोधन व विकास प्रक्रियेत प्रगत तंत्रज्ञानाची भूमिका’ असा आहे. या परिषदेत पारंपरिक औषधी ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड देत जागतिक दर्जाची औषधनिर्मिती करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.
औषधनिर्मितीतील नव्या घडामोडी, प्रगत तंत्रज्ञान आणि औद्योगिक गरजांशी सुसंगत शैक्षणिक दृष्टिकोन यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी शिक्षण व उद्योग क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून गव्हर्नमेंट फार्मसी कॉलेज, रत्नागिरीचे प्राचार्य डॉ. सुनीलकुमार बोथा, विषयतज्ज्ञ म्हणून गोवा कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ. तितीक्ष देवळे, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचे अमोघ दांडेकर यांची उपस्थिती आहे. सकाळच्या सत्रात मान्यवरांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांशी संवाद, दुपारच्या सत्रात भित्तिपत्रक सादरीकरण स्पर्धा होईल. यामध्ये विविध राज्यांतील विद्यार्थी संशोधनात्मक संकल्पना मांडतील. या स्पर्धेत कर्नाटक, गोवा, गुजरात व महाराष्ट्र आदी ठिकाणांहून विद्यार्थी, शिक्षक व संशोधक सहभागी होणार आहेत. परिषद यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. विजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समिती सचिव प्रा. गौरी भिवशेट, समन्वयक डॉ. तुषार रुकारी, डॉ. रोहन बारसे, डॉ. विनोद मुळे, प्रा. सत्यजित साठे व प्रा. स्नेहा सावंत विशेष मेहनत घेत आहेत.

function fbPixel () { if (fired) return; fired = true;

!function(f,b,e,v,n,t,s){ if(f.fbq) return; n=f.fbq=function(){ n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments) }; if(!f._fbq) f._fbq=n; n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0'; n.queue=[]; t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v; s=b.getElementsByTagName(e)[0]; s.parentNode.insertBefore(t,s); }(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');

fbq('init', '131893666558789'); fbq('track', 'PageView'); }

function trigger() { fbPixel(); cleanup(); }

function cleanup() { window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.removeEventListener('keydown', trigger); }

var passiveOpts = { passive: true, once: true };

// fire on first meaningful interaction window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.addEventListener('keydown', trigger, { once: true });

// safety fallback (user never interacts) setTimeout(fbPixel, 15000); })();

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart