
भोकणी येथील ग्रामपंचायतीने माझीवसुंधरा ५.० अभियानांतर्गत १५०० ते २००० लोकसंख्या असलेल्या गटात विभागीय स्तरावर ५० लाखांचेबक्षीस पटकावून घवघवीत यशसंपादन केले आहे. ग्रामपंचायतीने यापूर्वी माझी वसुंधरा अभियान ४. ० मध्ये राज्यस्तरावर तिसऱ्याक्रमांकाचे ५० लाखांचे बक्षीसमिळवले होते. आता पुन्हा दुसऱ्यांदामाझी वसुंधरा ५. ० मध्ये सहभागीहोऊन पर्यावरणपूरक कामांवर भरदेत बक्षिसाच्या रक्कमेला गवसणीघालण्याचा अनोखा पराक्रम केलाआहे. सरपंच अरुण वाघ यांच्या नेतृत्त्वात ग्रामपंचायतीने या स्पर्धेतसहभाग घेतला. पर्यावरण विकासकामांवर भर देत स्वच्छता,वृक्षारोपण, पाणी व्यवस्थापन,बंदिस्त गटारी, रस्ते, शासकीयइमारतींची रंगरंगोटी, नैसर्गिकधबधबा, प्राणी-पक्ष्यांच्या हुबेहूबप्रतिकृती, पर्यावरणपूरक प्रवेशद्वार,प्लास्टिक बंदी, महिला सबलीकरण,आरोग्यविषयक जनजागृती आणिशैक्षणिक मूल्ये असे अनेक उपक्रमराबवण्यात आले. या कामांची दखलघेऊन ग्रामविकास मंत्रालय वमहाराष्ट्र राज्य विभागीय स्तरावर ५०लाखांचे बक्षीस नुकतेच जाहीर झालेआहे. या उपक्रमासाठी ग्रामपंचायतकर्मचारी, आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका, मनरेगा मजूरआणि महिला बचत गटांच्यासदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकारपवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारीफडोळ, गटविकास अधिकारीअशोक भवारी, निलेश भुजाळ,सहाय्यक गटविकास अधिकारीढवळे व ग्रामसेवक योगेश राहाणेयांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामपंचायतला आतापर्यंत मिळालेले पुरस्कार सिन्नर तालुक्यातील पहिले हगणदारी मुक्त गाव (२०१७/२०१८), संतगाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (२०१८/२०१९) मुसळगाव गट प्रथम,संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (२०२२ ते २३) तालुका स्तरावरप्रथम, माझी वसुंधरा अभियान २०२४ (राज्यस्तरीय तिसऱ्या क्रमांकाचे ५०लाख रुपये बक्षीस, अटल भूजल योजना व समृद्ध गाव (२०२३ ते २०२४)जिल्हा स्तरावर प्रथम ५० लाख रुपये बक्षीस, आर. आर. आबा सुंदर गावपुरस्कार २०२५ तालुका स्तरावर १० लाख रुपये बक्षीस, आर. आर. आबासुंदर गाव २०२४/२५ जिल्हा स्तरावर २० लाख रुपये बक्षीस, माझी वसुंधरा५.० २०२५ जिल्हा स्तरावर ५० लाख रुपये बक्षीस.