Monday, March 23, 2026
HomeSportभोंदूबाबा कॅप्टन खरातच्या फार्महाउसमधून पिस्तूल जप्त; झडतीत आणखी आक्षेपार्ह व्हिडीओ पोलिसांच्या हाती...

भोंदूबाबा कॅप्टन खरातच्या फार्महाउसमधून पिस्तूल जप्त; झडतीत आणखी आक्षेपार्ह व्हिडीओ पोलिसांच्या हाती Nashik Marathi News | Pistol seized from Bhondubaba Captain Kharat’s farmhouse Police recuperate extra objectionable movies throughout search

नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासासाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. पुणे येथील पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते (आयपीएस) यांच्याकडे एसआयटीप्रमुख म्हणून तपासाची सूत्रे असतील. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे असलेल्या खरातच्या फार्महाउसमधून पोलिसांनी पिस्तूल जप्त केले आहे. तसेच झडतीत आणखी काही आक्षेपार्ह व्हिडीओसुद्धा हाती लागल्याचे समजते. 

खरातला त्याचा एकेकाळचा नोकरच ब्लॅकमेल करीत असल्याचा संशय गडद झाल्याने घटनेतील गुंतागुंत वाढली आहे. या घटनेचे धागेदाेरे शिर्डी येथील एका प्रकरणाशी जोडले जात आहेत. शिर्डी परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने आपले एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील फोटो तयार करत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी खरातकडे नोकरीला असलेल्या नीरज जाधव याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. 

नोकराकडूनच कॅप्टनला ब्लॅकमेलची धमकी?
नीरज जाधव हा खरातकडे ऑफिसबॉय होता. शिर्डी येथील तक्रारदार तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे तीन वर्षांपूर्वी नाशिक येथे खरात याच्या कार्यालयात नीरजशी तिची ओळख झाली.
या ओळखीचा गैरफायदा घेऊन जाधव पीडित महिलेला बनावट अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. नंतर हाच जाधव खरात यालाही ब्लॅकमेल करीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. 

तपासात आता पुढे काय?
‘एसआयटी’कडे तपासाची सूत्रे आल्यानंतर डिजिटल फॉरेन्सिक तपासाचा आधार घेतला जाणार असून, पोलिसांच्या हाती लागलेल्या ५८ व्हिडीओंमधील पीडितांना न्याय देण्यावर भर असेल. फोन कॉल्स तपासणे, तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे कामसुद्धा सुरू करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहार, नेटवर्क तपास, संभाव्य सहकारी आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. याशिवाय कॅप्टन खरात याचे आर्थिक सोर्स तपासून इतकी अमाप माया त्याने कशी जमविली, याचे सखोल विश्लेषण केले जाणार आहे. 

कॅप्टन अशोक खरात २०० कोटींचा मालक
अशोक खरात याने राजकीय मंडळी, प्रशासनातील बडे अधिकारी, तसेच सेलेब्रिटी यांना जाळ्यात ओढून अमाप माया जमविली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
नाशिक शहर, तसेच सिन्नर येथील आलिशान बंगले, मीरगाव (ता. सिन्नर) येथे आलिशान फार्महाउस, याशिवाय अनेक जमिनी, स्वतः तसेच कुटुंबीयांच्या नावे आहेत. 

सोने, चांदी अन् मौल्यवान वस्तू, दोन महागड्या कार अशा एकूण तब्बल २०० कोटींच्या संपत्तीचा मालक खरात हाच असल्याचा अंदाज आहे.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments