भिवंडीच्या महापौरपदी नारायण चौधरी:काँग्रेसने भाजपला दिला जबर झटका; ऐनवेळी समीकरणे बदलली

भिवंडीच्या महापौरपदी नारायण चौधरी:काँग्रेसने भाजपला दिला जबर झटका; ऐनवेळी समीकरणे बदलली
भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी अखेर भाजपचे बंडखोर पदाधिकारी नारायण चौधरी यांची निवड झाली आहे. या प्रकरणी आज झालेल्या निवडणुकीत चौधरी यांना स्पष्ट बहुमत मिळाले. नारायण चौधरी यांच्या निवडीमुळे भाजपला जोरदार झटका बसला आहे. भाजपने या प्रकरणी चौधरी यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने सुरुवातीला भिवंडीच्या महापौरपदासाठी नारायण चौधरी यांचे नाव निश्चित केले होते. पण त्यानंतर अचानक स्नेहा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. भाजपच्या या निर्णयामुळे नारायण चौधरी व त्यांचे सहकारी नगरसेवक नाराज झाले होते. चौधरी यांनी या प्रकरणी उघड नाराजी व्यक्त करत आपल्या 8 समर्थक नगरसेवकांपासून काँग्रेसला जाऊन मिळाले. त्यानतंर आज झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना नारायण चौधरींच्या बाजूने मतदान करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, आज दुपारी झालेल्या निवडणुकीत चौधरी यांना तब्बल 48 मते मिळाली. यासंबंधीच्या माहितीनुसार, स्व. विलासरावजी देशमुख सभागृहात दुपारी 12 वा. निवडणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर हात वर करून झालेल्या मतदानात नारायण चौधरी यांना 48 मते मिळाली. यात काँग्रेसच्या 30, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 12 व चौधरी समर्थक 8 नगरसेवकांचा समावेश होता. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart