Wednesday, February 25, 2026
HomeNewsMartahiभिगवण अपहरण प्रकरण- माझ्या मर्जीने आले तरुणीची कबुली:व्हिडिओ जबरदस्तीने बनवल्याचा गोपीचंद पडळकरांचा...

भिगवण अपहरण प्रकरण- माझ्या मर्जीने आले तरुणीची कबुली:व्हिडिओ जबरदस्तीने बनवल्याचा गोपीचंद पडळकरांचा दावा

भिगवण अपहरण प्रकरण- माझ्या मर्जीने आले तरुणीची कबुली:व्हिडिओ जबरदस्तीने बनवल्याचा गोपीचंद पडळकरांचा दावा
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात लग्नाच्या खरेदीसाठी गेलेल्या एका तरुणीचे भरदिवसा आई आणि भावासमोर अपहरण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. अपहरण करणाऱ्या दोन तरुणांनी आई आणि भावाच्या डोळ्यात तिखट फेकून तरुणीला नेल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या संदर्भात अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण-तरुणीमध्ये मोबाइलवरून संपर्क असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही घटना अपहरणाची आहे की प्रेमसंबंधातून घडलेला प्रकार, याबाबत शक्यता तपासल्या जात आहेत. दरम्यान, भिगवण पोलिस ठाण्याच्या समोर हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. तर आता तरुणीचा देखील कथित व्हिडिओ समोर आला असून, अपहरण झाले नसून मी स्वतःहूनच गेल्याची कबुली तरुणीने दिली आहे. माझे आणि त्याचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत, त्याने कोणत्याही प्रकारची जबरदस्ती मला केली नाही. मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत निघून आले आहे, असे या तरुणीने व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले आहे. या घटनेप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी माहिती देताना सांगितले की, आरोपीला शोधण्यासाठी 6 टीम रवाना करण्यात आल्या आहेत. गोपनीय आणि तांत्रिक तपास सुरू आहे. काल वातावरण तापले होते, सर्व समाजाच्या प्रतिनिधींसोबत आमचे बोलणे झाले आहे. तसेच पोलिस काटेकोरपणे तपास करत आहेत, असेही गिल यांनी म्हटले आहे. तसेच कोणीही ताणतणावाचे वातावरण निर्माण करू नये. पोलिसांकडून जन आक्रोश मोर्चाला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. कुटुंबाला आम्ही माहिती देत असून त्यांच्याकडूनही माहिती घेत आहोत. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिस आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आम्ही केले आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. आरोपी आणि पीडित एकमेकांच्या घराशेजारी राहतात, ते संपर्कात होते, याचा तपास सुरू आहे, बाकी माहिती तपास पुर्ण झाल्यानंतर समोर येईल, असे संदीप सिंह गिल यांनी म्हटले आहे. तरुणी आणि अपहरण करणारा तरुण आधीपासून संपर्कात अपहरण झालेली मुलगी आणि ज्याच्यावर अपहरणाचा आरोप आहे त्या तरुणामधे मागील दीड महिन्यात 11 वेळा संपर्क झाला आहे. यातील 3 वेळा अपहरणाचा आरोप असलेल्या मुलाने मुलीला फोन केला असून 8 वेळा मुलीने मुलाला एसएमएस केले आहेत. आरोपी मुलाने केलेले हे फोन मध्यरात्री उशीरा केले आहेत. या तीन कॉलचे ड्युरेशन अवघे 3 ते 5 सेकंद इतकेच आहे. मात्र, त्यानंतर लगेचच त्यांच्यामध्ये व्हॉटसॲप कॉल सुरू झाले आहेत. या व्हॉटसॲप कॉलचे डिटेल्स आणि व्हॉटसॲप चॅटचे डीटेल्स मिळवण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार केला- आमदार गोपीचंद पडळकर आता या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार करुन पोलिस अधिकारी, त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जात आहे. मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केली आहे. मुलीला वडील नाहीत. मुलीचे लग्न ठरलेले होते, दोन चार दिवसात लग्न होणार होते, अशा परिस्थितीत जबरदस्तीने मुलीचे अपहरण केले गेले आहे. मुलीचे अपहरण झाल्याने भिगवणला आलो आहे. भिगवण पोलिस स्टेशनला भेट देणार आहे. हिंदू समाज संतापलेला आहे. हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले आहे. बाकीची सविस्तर चर्चा पोलिस स्टेशनला अधिकाऱ्यांसोबत करणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षकांसोबत फोनवर चर्चा केली आहे. हा व्हिडिओ कोठून आला असा प्रश्न विचारला. लोकेशन न दिसणारे एप वापरले आहे, असे पोलिसांनी सांगितल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, पोलिसांना व्हिडिओ पाठवणे, घरच्यांना व्हिडिओ पाठवणे म्हणजे त्यांचे धाडस वाढले आहे. या मुलाला वाचवण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहे असा त्याचा अर्थ आहे. मुलाचे चुलते इथले गुंड आहेत. हिंदू मुलींच्या अपहरणात तो आरोपी होता. काही महाराजांना मारहाण केलेली आहे. मंदिरामध्ये ते कब्जा घेत आहेत, मंदिरातील मूर्तींची मोडतोड केलेली आहे, असे का घडत आहे? पोलिस प्रशासन इतके दिवस का गप्प आहे? वेगवेगळ्या गुन्ह्यात तो आरोपी आहे, माझ्याकडे यादी आहे. इतक्या गुन्ह्यात तो आरोपी असेल तर त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई का झाली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

Tutorial de trading en gate.io on Insurance Agency Lead Scoring