भारताला कोणीतरी ब्लॅकमेल करतंय का?:राफेल आणि एपस्टाईन फाइलवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

भारताला कोणीतरी ब्लॅकमेल करतंय का?:राफेल आणि एपस्टाईन फाइलवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
अमेरिकेसोबत भारताचे सुरू असलेले करार, फ्रान्ससोबत सुरू असलेल्या घडामोडी यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. तसेच एपस्टाईन फाइलच्या मुद्द्यावरून देखील कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत चांगलाच हल्लाबोल केला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य करत मोदी सरकारवर टीका केली आहे. भारताला कोणीतरी ब्लॅकमेल करत असल्याची शंका दिवसेंदिवस वाढत आहे. उद्या मुंबईत अनेक सामाजिक संघटनांसोबत बैठक आहे. त्यात एपस्टाईन फाइल, अमेरिकेसोबतचा व्यापार करार आणि लष्करप्रमुखांच्या पुस्तकावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपली विमाने का पडली? ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय राफेल विमान पाडण्यात आले. पाडण्याचे कारण लढाऊ विमान नाही. तर फ्रान्स राफेलचा कोड आमच्यासोबत शेअर करण्यास तयार नव्हता. कोड शेअर न केल्याने रडार रेंज कमी होती आणि शत्रूच्या विमानांनी रडारच्या पलीकडून राफेलवर हल्ला केला. त्यामुळेच आपले विमान पडले. आता भारत पुन्हा फ्रान्सकडून राफेल विमान खरेदी करत आहे. भारताची सरकारी कंपनी एचएएल राफेल बनवणार आहे? की एपस्टाईन फाइलमध्ये दिसणारे अनिल अंबानी ते बनवतील? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. फ्रान्सशी करार करण्यासाठी दबाव आणत आहे का? रशिया भारताला पाचव्या पिढीतील लढाऊ विमान एसयू-57 विकण्यास तयार आहे आणि संपूर्ण तंत्रज्ञान पुरवण्यास देखील तयार आहे. हे विमान राफेलपेक्षा स्वस्त आहे आणि त्यात आधुनिक तंत्रज्ञान आहे. अशा परिस्थितीत, सरकार जनतेला सांगणार आहे का? की भारत राफेल विमानात स्क्रू फिटिंग करणार आहे की भारताला संपूर्ण तंत्रज्ञान मिळणार आहे? तसेच एपस्टाईन फाइलमध्ये नरेंद्र मोदींचे नाव आल्याने अमेरिका त्यांच्यावर फ्रान्सशी करार करण्यासाठी दबाव आणत आहे का? असा देखील प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत एआय इम्पॅक्ट समिट सुरू आहे. यासाठी देश-विदेशातून अनेक मान्यवर नेते व दिग्गज मंडळी भारतात आले आहेत. त्यात एपस्टाईन फाइलमध्ये नाव आलेले बिल गेट्स देखील दिल्लीत उपस्थित आहेत. यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. एपस्टाईन फाइल्समध्ये नाव असलेल्या बिल गेट्सला का बोलावले?- पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत म्हटले की, दिल्लीत चालु असलेल्या एआय इम्पॅक्ट समिटसाठी भारत सरकारने बिल गेट्स यांना आमंत्रित केले आहे हे आश्चर्यकारक आहे. एपस्टाईन घोटाळ्यातील त्यांचा सहभाग अगदी स्पष्ट आहे आणि त्यांनी स्वतः ते मान्य केले आहे. भारत सरकारने त्यांना का आमंत्रित केले आहे आणि भारतातील तरुणांसमोर आदर्श म्हणून त्यांना का उभे केले आहे हे अनाकलनीय आहे. सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart