बेल्हे, ता. २० : बेल्हे (ता. जुन्नर) येथे समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी तसेच इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंटस स्पोर्ट्स असोसिएशन (IEDSSA) यांच्या वतीने, नुकतेच आंतरविभागीय कुस्ती व वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
बेल्हे येथे समर्थ शैक्षणिक संकुलात स्पर्धेची समारंभपूर्वक सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष घुले, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, क्रीडा संचालक प्रा. हरिश्चंद्र नरसुडे तसेच विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कुस्ती स्पर्धा निकाल – एकूण स्पर्धक : ६२
५७ किलो : विजेता – वेदांत देवरे (एच. एच. जे. बी. पॉलिटेक्निक, नाशिक)
६१ किलो : प्रवीण गुजरे (श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पॉलीटेक्निक, सोलापूर)
६५ किलो : राज पाटील( संजय एज्युकेशन सोसायटी पॉलिटेक्निक, धुळे)
७० किलो : सिद्धार्थ वाघ (डोरे पॉलीटेक्निक, धुळे)
७४ किलो : प्रज्वल कदम( जे.ए.आर.एस.एच. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर पॉलिटेक्निक विटा,सांगली)
८६ किलो : प्रतीक शिंदे (सोनिया गांधी पॉलिटेक्निक, श्रीगोंदा)
९७ किलो : गौरव खरचे(इंदिरा गांधी पॉलिटेक्निक,श्रीगोंदा)
१२५ किलो : हर्षवर्धन गांगर्डे (सोनिया गांधी पॉलीटेक्निक, श्रीगोंदा)
वेटलिफ्टिंग स्पर्धेचा निकाल : एकूण स्पर्धक : ५४
५६ किलो : प्रथम – ओम मोरे (जयहिंद पॉलिटेक्निक, कुरण) द्वितीय – जयान शेख (जे. पी. पॉलिटेक्निक, औरंगाबाद)
६२ किलो : प्रथम – ओंकार शिंदे (राजीव गांधी पॉलिटेक्निक, लातूर) द्वितीय – रुद्र पोद्दार (न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक, कोल्हापूर)
६९ किलो : प्रथम – श्रीराज बोडके (के. जे. सोमय्या पॉलिटेक्निक, मुंबई)
द्वितीय – वेदांत गायकवाड (श्रीमती गीता डी. तटकरे पॉलिटेक्निक)
७७ किलो : प्रथम – सुजल मोरे (डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, कोल्हापूर) द्वितीय – ऋषिकेश अहिरे (सौ. शांतीदेवी चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक चाळीसगाव)
८५ किलो : प्रथम – तेजस वीरकर (श्रीमती गीता डी. तटकरे पॉलिटेक्निक कोलाड) द्वितीय – कुणाल चासकर (जयहिंद पॉलिटेक्निक कुरण, जुन्नर)
९४ किलो : प्रथम – विनायक खेडकर (सोनिया गांधी पॉलिटेक्निक श्रीगोंदा) द्वितीय – श्रेयस पांगरे (ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीज पॉलिटेक्निक, पुणे)
१०५ किलो : प्रथम – करण ठोंबरे (भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक पुणे) द्वितीय – फिरोज फेज (अंजुमन इस्लाम पॉलिटेक्निक, मुंबई)
१०५+ किलो : प्रथम – अथर्व तायडे (गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, नागपूर) द्वितीय – शिवम वाकळे (ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस पॉलीटेक्निक नांदेड)
दरम्यान स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी डॉ. सचिन भालेकर, क्रीडा शिक्षक सुरेश काकडे, विनायक वऱ्हाडी, राहुल अहिरे यांनी सांभाळली. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.