बुधवार पेठेत 11 बांगलादेशी तरुणी ताब्यात:बनावट आधार आणि रेशनिंग कार्डावर रहिवास; आठवडभरात दुसरी मोठी मोहीम

बुधवार पेठेत 11 बांगलादेशी तरुणी ताब्यात:बनावट आधार आणि रेशनिंग कार्डावर रहिवास; आठवडभरात दुसरी मोठी मोहीम
पुणे पोलिसांनी बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत मोठी कारवाई करत ११ बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेतले आहे. आठवडभरातील ही दुसरी मोठी मोहीम असून, बेकायदेशीर वास्तव्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. प्राथमिक तपासात ताब्यात घेतलेल्या २२ तरुणींपैकी ११ जणी बांगलादेशी नागरिक असल्याचे समोर आले आहे. फरासखाना आणि खडक पोलिसांच्या पथकाने बुधवार पेठेत संयुक्तपणे ही कारवाई केली. पोलिसांनी येथील कुंटणखान्यांची तपासणी केली असता, संशयावरून २२ तरुणींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान, ११ तरुणींनी त्यांची ओळखपत्रे आणि नागरिकत्वाची कागदपत्रे सादर केली, तर उर्वरित ११ तरुणींनी आपण बांगलादेशी असल्याचे सांगितले. कागदपत्रांच्या तपासणीतही त्यांची बांगलादेशी नागरिकता उघड झाली. यापूर्वीही बुधवार पेठेत पोलिसांनी कारवाई करत दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेतले होते. त्यावेळी अमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला अटक करून चरस आणि इंजेक्शन जप्त करण्यात आली होती. आता ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी तरुणी पुण्यात कशा आल्या, त्यांना कोणत्या दलालांनी आणले, याचा तपास पोलिस करत आहेत. दलालांच्या नेटवर्कची खातरजमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आठवड्याभरापूर्वी पोलिसांनी बुधवार पेठेत ७०० जणांची चौकशी केली होती. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह फरासखाना पोलिस ठाण्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ज्या कुंटणखान्यांमध्ये बांगलादेशी तरुणी आढळल्या, ते सील करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असे आयुक्तांनी सांगितले. यापुढे बुधवार पेठेत नियमितपणे कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart