बाल वैज्ञानिक स्पर्धेत कर्मवीरचे सुयश

विरार, ता. १९ (बातमीदार) : अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत मॉडर्न स्कूल वाशी येथे पार पडलेल्या (जिल्हास्तरीय) विज्ञान प्रदर्शनात ठाणे, पालघर व नवी मुंबई येथील विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. हा कार्यक्रम डीआयईटी ठाणे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. विविध अटल टिंकरिंग लॅबमधील तालुकास्तरीय विजेत्यांना एकत्र करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण अधिकारी अशोक कडू यांनी केले. या कार्यक्रमास डॉ. संजय वाघ आणि डॉ. प्रभा खरटमोल यांच्यासह मान्यवर पाहुणे, सहभागी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय भरविण्यात आलेल्या या विज्ञान प्रदर्शनात एकूण चार गट करण्यात आले होते. त्यापैकी मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल व थीम बेस या चारही गटामधून विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर केले. सदरच्या विज्ञान प्रदर्शनास कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एस. पी. ज्युनिअर कॉलेज जुचंद्र या शाळेला एका गटातून प्रथम क्रमांक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत शाळेतील अटल प्रमुख मानसी साळुंखे, विजय पाटील व दिपाली विसावे हे उपस्थित होते. विद्यालयाच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा रायगड विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी विलासराव जगताप सर व सर्व सेवकांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

function fbPixel () { if (fired) return; fired = true;

!function(f,b,e,v,n,t,s){ if(f.fbq) return; n=f.fbq=function(){ n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments) }; if(!f._fbq) f._fbq=n; n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0'; n.queue=[]; t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v; s=b.getElementsByTagName(e)[0]; s.parentNode.insertBefore(t,s); }(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');

fbq('init', '131893666558789'); fbq('track', 'PageView'); }

function trigger() { fbPixel(); cleanup(); }

function cleanup() { window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.removeEventListener('keydown', trigger); }

var passiveOpts = { passive: true, once: true };

// fire on first meaningful interaction window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.addEventListener('keydown', trigger, { once: true });

// safety fallback (user never interacts) setTimeout(fbPixel, 15000); })();

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart