Wednesday, February 25, 2026
HomeNewsMartahiपुण्यात चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला, VIDEO:किरकटवाडी परिसरातील घटना; अंगावर शहारे आणणारी घटना...

पुण्यात चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला, VIDEO:किरकटवाडी परिसरातील घटना; अंगावर शहारे आणणारी घटना CCTV मध्ये कैद

पुण्यात चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला, VIDEO:किरकटवाडी परिसरातील घटना; अंगावर शहारे आणणारी घटना CCTV मध्ये कैद
पुणे शहरातील किरकटवाडी परिसरात एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाली असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरकटवाडीतील चैत्रांगण सोसायटीच्या आवारात हा प्रकार घडला. संबंधित चिमुकला नेहमीप्रमाणे सोसायटीच्या परिसरात खेळत होता. त्या वेळी अचानक काही भटकी कुत्री त्याच्या दिशेने धावत आली. काही क्षणांतच कुत्र्यांनी त्याला घेरत झडप घातली. या अनपेक्षित हल्ल्यामुळे घाबरलेल्या मुलाने जिवाच्या आकांताने ओरडायला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगा स्वतःचा बचाव करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. तरुणाने धाव घेतल्यामुळे मुलगा बचावला मुलाचा आरडाओरडा ऐकून जवळच असलेला एक तरुण तत्काळ घटनास्थळी धावला. त्याने धाडस दाखवत कुत्र्यांना दूर हुसकावून लावले आणि मुलाला त्यांच्या तावडीतून सोडवले. या तरुणाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचा दावा केला जात आहे. मुलाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. सुदैवाने त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दरम्यान, या घटनेनंतर सोसायटीतील रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी यापूर्वीही महापालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र, ठोस कारवाई न झाल्यामुळे अखेर अशी गंभीर घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालकवर्गात संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात आणखी गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे. खाली पाहा घटनेचा व्हिडिओ

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

Tutorial de trading en gate.io on Insurance Agency Lead Scoring