Thursday, March 19, 2026
HomeNewsMartahiपंढरपुरात दोन आघाड्यात खडाखडी सुरू; ‘इगो'ची लढाई:प्रशासन सापडले कात्रीत,भाजपकडून नगराध्यक्ष प्रणिता भालकेंची...

पंढरपुरात दोन आघाड्यात खडाखडी सुरू; ‘इगो’ची लढाई:प्रशासन सापडले कात्रीत,भाजपकडून नगराध्यक्ष प्रणिता भालकेंची कोंडी करण्याचा प्रयत्न‎

पंढरपुरात दोन आघाड्यात खडाखडी सुरू; ‘इगो’ची लढाई:प्रशासन सापडले कात्रीत,भाजपकडून नगराध्यक्ष प्रणिता भालकेंची कोंडी करण्याचा प्रयत्न‎

पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत नागरिकांनी नगराध्यक्ष एका आघाडीचा केला तर बहुमत दुसऱ्या आघाडीला दिले आहे. त्याचे परिणाम आता पालिकेत आणि शहरातील कारभारात दिसू लागले आहेत. पुढच्या काळात या दोन्ही आघाड्यांमधील संघर्ष शहरातील नागरिकांचे करमुक्त मनोरंजन क

.

पंढरपूर नगरपालिका निवडणूक डिसेंबर महिन्यात झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि पंढरपूर- मंगळवेढा विकास आघाडी यांच्या आघाडीला ३६ पैकी २४ जागा असे बहुमत मिळाले. परंतु नागराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप प्रणित आघाडीच्या उमेदवाराचा ११ हजाराहून अधिक मतांनी दारुण पराभव झाला आहे. हा पराभव माजी आ. प्रशांत परिचारक आणि भाजप आघाडीच्या नेत्यांना जिव्हारी लागला आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि विषय समितीच्या निवडीपासून भाजप आघाडीने नगराध्यक्षा भालके यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे असे दिसते.

नगरपालिकेच्या पहिल्याच सभेत भाजपच्या नगरसेवकांनी प्रशासनाचा सत्कार नाकारून सभागृहात गोंधळ उभा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विषय समितीच्या निवडी, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी भाजप आघाडीने आपल्या सोयीने करून घेतल्या. शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर रान उठवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. नागराध्यक्ष भालके यांच्या कार्यक्रमास भाजप आघाडीचे नगरसेवक सहकार्य करत नाहीत, तर बहुमताच्या जोरावर प्रशासनाला आपल्या धोरणानुसार काम करण्यासाठी वेठीस धरले जात असल्याचे दिसून येते. शहरातील आठ वर्षे बंद असलेल्या पद्मावती उद्यानाची स्वच्छता नगराध्यक्ष भालके यांनी पुढाकार घेऊन केली. त्या कार्यक्रमावर भाजप आघाडीच्या नगरसेवकांनी अघोषित बहिष्कार टाकला आहे. तर महात्मा फुले स्मारकाजवळ असलेला फुलांचा बाजार सांगोला रोडवर तुकाई मंदिराजवळ स्थलांतरीत करण्याचा कार्यक्रम नगराध्यक्ष भालके यांच्या परस्पर उरकून घेतला. शहरातील जिजामाता उद्यानाचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. हे उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात येत आहे. या उद्यानाची पहाणी भाजप आघाडीच्या नगरसेवकांनी करत लवकरच हे उद्यान खुले करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. दुसऱ्या बाजूला तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्यावतीने कायदेशीर माहिती काढून स्वीकृत नगरसेवकांच्या हक्क आणि प्रशासनातील मर्यादांची माहिती चव्हाट्यावर आणून भाजप आघाडीला एकप्रकारे डिवचले आहे. लवकरच पालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक सादर केले जाईल हे अंदाजपञक तयार करतानाही दोन्ही आघाड्यांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

दोन आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि भाजप आघाडीमधील या राजकारणाच्या कात्रीत पालिका प्रशासन सापडले आहे. गेल्या अनेक दशकांपासून पालिकेवर परिचारक गटाचे वर्चस्व असल्याने प्रशासनातील बहुतांश कर्मचारी हे भाजप आघाडीच्या फेव्हर मध्ये असल्याचा आरोप विरोधी आघाडीकडून होतेय. तर नगराध्यक्ष भालके यांच्या कामावर पाळत ठेवण्याची जबाबदारी भाजपकडून काही कर्मचाऱ्यांना दिल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्याच्या कात्रीत प्रशासन अडकले आहे.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments