निगडी, रूपीनगर परिसरात शिवजयंतीचा जल्लोष

निगडी, ता. २० : निगडी येथील दुर्गा टेकडी येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवजयंती साजरी करण्यात आली. सोहळ्यात राजेंद्र घावटे यांचे ‘युगप्रवर्तक छत्रपती शिवराय’ या विषयावर व्याख्यान झाले.
यावेळी नवनिर्वाचित उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुप्रभात मित्र परिवार, सूर्यनमस्कार ग्रुप, जय हरी ग्रुप, सूर्योदय ग्रुप यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अठरापगड जातींना सोबत घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सार्वभौम लोकशाही व्यवस्थेचा पाया रचला. वर्षानुवर्षे येणाऱ्या आक्रमणांचा यशस्वी प्रतिकार केला. प्रतिकूल परिस्थितीत स्वकीयांचे राज्य निर्माण केले. म्हणून शिवाजी महाराज हे लोकोत्तर युगपुरुष आहेत, असे प्रतिपादन शिवव्याख्याते घावटे यांनी केले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक मोहिते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी राजेंद्र बाबर, भरत देशमुख, रघुनाथ रोकडे, मल्लिकार्जुन, दत्ता गोंजारी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष देविदास ढमे यांनी केले.
बाबा नायकवडी, शंकर राणे, कांशीराम भोसले, विजय शिंदे, सुरेश मुळूक आदींनी सहकार्य केले. रवींद्र मोहिते यांनी आभारप्रदर्शन केले.

रुपीनगर येथे पहाटे शिवरायांच्या पोवाड्याने जयंतीची सुरुवात
रुपीनगर येथे स्वयंभू युवामंचाच्या पहाटे छत्रपती शिवरायांच्या पोवाड्याने शिवजयंतीची सुरुवात झाली. सकाळी मशाल प्रज्वलित करून शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. प्रतिमापूजनानंतर शिववंदना सादर केली. या प्रसंगी नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, नगरसेविका शीतल वर्णेकर, शिवानी नरळे तसेच रवींद्र सोनवणे, वसंत पतंगे, धनंजय वर्णेकर, रमेश भालेकर आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. अनेक बालचमूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर भाषणे केली तसेच पोवाडे सादर केले. स्वयंभू युवा मंचाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन गौतम दळवी यांनी केले. मंचाचे अध्यक्ष किरण गाढवे यांनी आभार मानले.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart