सिद्धेशदादाचे रेवडीतील शाळेसाठी आगळे दातृत्व
अनोखी भेट; इंटर ॲक्टिव्ह पॅनेलसह संगणकांचा समावेश
सुनील शेडगे : सकाळ वृत्तसेवा
नागठाणे, ता. १८ : ३० दिवसांत राज्यातील ३० शाळांसाठी तीन कोटी रुपये उभे करणाऱ्या, देशातील आघाडीचा सोशल इम्पॅक्ट स्टोरिटेलर अन् कंटेंट क्रिएटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धेशदादाने रेवडी (ता. कोरेगाव) येथील प्राथमिक शाळेस आपल्या दातृत्वाने हातभार लावला. त्याने शाळेस दोन इंटर ॲक्टिव्ह पॅनेल, चार संगणकास स्कूल बॅग, खेळाचे साहित्य भेट दिले.
सिद्धेशदादा अर्थातच सिद्धेश लोकरे हा तरुण. राज्यातील प्राथमिक शाळांसाठी हाती घेतलेले त्याचे अभियान सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे. या अभियानात रेवडीच्या शाळेचा समावेश आहे. त्यातून सिद्धेशने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शाळेस भेट दिली होती. त्याच्याच प्रयत्नातून शाळेतील आरोही आवारे या कुस्तीपटूचा ऑलिंपिकपदक विजेती साक्षी मलिकशी संवाद झाला होता. अक्षरा पवार या बुद्धिबळ खेळाडूलाही तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले होते. दुसऱ्या टप्प्यात सिद्धेशने शाळेस भेट दिली. त्यात क्रिएट टुगेदर फाउंडेशनतर्फे त्याने शाळेसाठी दोन इंटर ॲक्टिव्ह पॅनेल, चार संगणक, ४० स्कूल बॅग, तसेच खेळाचे खेळ साहित्य भेट दिले. या वेळी मुख्याध्यापक प्रकाश नलवडे, माया वाघमळे, देवानंद रणदिवे, शिवानी निंबाळकर हे शिक्षक उपस्थित होते. या भेटीत सिद्धेशने विद्यार्थ्यांशी गप्पागोष्टी केल्या. त्यांना विविध कानमंत्र दिले.
चौकट
सिद्धेशदादा याच्याविषयी…
सिद्धेशने ‘मिशन ३०३०३ वन कम्युनिटी वन ड्रीम’ या नावाची मोहीम हाती घेतली आहे. ३० दिवसांत राज्यातील ३० शाळांपर्यंत पोचून त्यांच्यासाठी तीन कोटी रुपयांची मदत उभी करण्याचे काम तो सध्या करत आहे. ग्रामीण शिक्षण क्षेत्र अन् मराठी शाळा यांच्यासाठी त्याचे भरीव कार्य प्रभावीपणे सुरू आहे.
छायाचित्र ओळी
08179
रेवडी : प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत सिद्धेश लोकरे.