धामंत्री येथील नागेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मांदियाळी:हर हर महादेव”च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला

धामंत्री येथील नागेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मांदियाळी:हर हर महादेव”च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला
प्रतिनिधी | तिवसा प्राचीन व जागृत देवस्थान असलेल्या श्री नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री येथे महाशिवरात्री महोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यंदा महोत्सवाला अक्षरशः भाविकांचा जनसागर उसळला होता. दर्शनाकरिता मंदिर परिसरात रांगांच्या रांगा लागलेल्या होत्या व लाखो भाविकांनी भगवान महादेवांचे दर्शन घेतले. दिवसभर अभिषेक, पूजाअर्चा, आरती व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. हर हर महादेव”च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भाविकांसाठी दर्शन व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता व इतर सोयींचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली. मुख्य अतिथी म्हणून आमदार दादाराव केचे, आमदार राजेश वानखडे, प्रीती बंड, धीरज केने, मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल औतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तिवसा व आर्वी तालुक्यातील पत्रकार बंधू, विविध संस्थांचे अध्यक्ष व मान्यवर यांचे संस्थानतर्फे स्वागत करून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart