दोन अवयवदानांतून पाच जणांना जीवदान;

दोन अवयवदानांतून पाच जणांना जीवदान
मुंबई विभागातील १३-१४वे अवयवदान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० ः मुंबईत १८ व १९ फेब्रुवारीला दोन मेंदूमृत रुग्णांच्या अवयवदानातून पाच जणांना नवजीवन मिळाले. राज्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार अवयवांचे वितरण करण्यात आले.
बुधवारी (ता. १८) अंधेरी येथील क्रिटिकेअर एशिया रुग्णालय येथे ६५ वर्षीय महिलेला उपचारादरम्यान मेंदूमृत घोषित करण्यात आले. कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्याने तिचे यकृत व दोन्ही मूत्रपिंड दान करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी (ता. १९) अंधेरीतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय येथे ६१ वर्षीय व्यक्तीला मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनीही अवयवदानास संमती दिली. त्यानुसार दोन्ही मूत्रपिंड दान करण्यात आले.
दोन्ही प्रकरणांमध्ये अवयवांचे वितरण राज्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात आले. या दोन अवयवदानांतून एक यकृत व चार मूत्रपिंड उपलब्ध झाले असून त्यातून पाच रुग्णांना जीवदान मिळाले. झेडटीसीसी, मुंबई यांच्या समन्वयातून संपूर्ण प्रक्रिया पार पडली.

function fbPixel () { if (fired) return; fired = true;

!function(f,b,e,v,n,t,s){ if(f.fbq) return; n=f.fbq=function(){ n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments) }; if(!f._fbq) f._fbq=n; n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0'; n.queue=[]; t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v; s=b.getElementsByTagName(e)[0]; s.parentNode.insertBefore(t,s); }(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');

fbq('init', '131893666558789'); fbq('track', 'PageView'); }

function trigger() { fbPixel(); cleanup(); }

function cleanup() { window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.removeEventListener('keydown', trigger); }

var passiveOpts = { passive: true, once: true };

// fire on first meaningful interaction window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.addEventListener('keydown', trigger, { once: true });

// safety fallback (user never interacts) setTimeout(fbPixel, 15000); })();

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart