दिंडोरी बनले सामाजिक परिवर्तनाचे ऊर्जापीठ:सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन, शेतीच्या बांधावर वृक्षारोपण

दिंडोरी बनले सामाजिक परिवर्तनाचे ऊर्जापीठ:सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन, शेतीच्या बांधावर वृक्षारोपण
दिंडोरी शहर केवळ नाशिकमधील एक ठिकाण नसून, ते भक्ती, कृषी, शिक्षण आणि आरोग्य या चतु:सूत्रीवर काम करणारे, अध्यात्मातून समाजपरिवर्तनाचा जागर घडविणारे समर्थनगरी म्हणून सातासमुद्रापार ओळखले जाऊ लागली आहे. विज्ञानाची कास धरत अध्यात्माच्या माध्यमातून मानवी कल्याणाचा मार्ग दाखवणारी ‘समर्थनगरी’ दिंडोरी सध्या विविध सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रमांनी गजबजली आहे. परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाने दिंडोरीचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवले आहे. दिंडोरी केवळ भक्तीचे ठिकाण न राहता सामाजिक परिवर्तनाचे ऊर्जापीठ ठरत आहे. शहरात शिवरायांचा वारसा जपण्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख गड-किल्ल्यांवर ‘दुर्ग संवर्धन अभियान’ राबवले जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कृषी महोत्सवानिमित्त ५००० पेक्षा अधिक पदांसाठी महा रोजगार मेळावा रोजगार उपलब्ध झाल्याने बेरोजगारी कमी झाली आहे, ज्याचा लाभ हजारो पदवीधर तरुणांनी घेतला. आजही दिंडोरीत रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना येथे मोफत मार्गदर्शन दिले जाते.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart