‘डोनेट युवर सायकल’ उपक्रमात ५० विद्यार्थिनींना सायकल वाटप:पारदर्शक प्रक्रियेद्वारे पात्र विद्यार्थ्यांची निवड

‘डोनेट युवर सायकल’ उपक्रमात ५० विद्यार्थिनींना सायकल वाटप:पारदर्शक प्रक्रियेद्वारे पात्र विद्यार्थ्यांची निवड
अकोला | प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती केवळ उत्सव नाही, तर सामाजिक बांधिलकी जपण्याची प्रेरणा आहे, याची प्रचिती गुरुवारी पुन्हा एकदा आली. शिवजयंतीनिमित्त ‘डोनेट युवर सायकल’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा सायकल वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. यंदा दुसऱ्या वर्षीही अॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व नीलेश देव मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जठार पेठ येथील कार्यालयात हा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. गरजू ५० विद्यार्थिनींना सायकलचे वितरण करण्यात आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाटकर्मी दिलीप देशपांडे होते. प्रमुख अतिथी म्हणून नरेंद्र देशपांडे, वैशाली देशपांडे, डॉ. स्नेहा गोखले, प्रा. रश्मी देव, वैशाली भारसाकळे उपस्थित होते. सूत्रसंचालन जयंतराव सरदेशपांडे यांनी केले. आभार अजय शास्ती यांनी मानले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत कैलास तिरपुडे, विजय वाघ, संजय देशमुख, राम उमरेकर व दत्ता भांबेरे यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक नीलेश देव, राजेंद्र गुणलवार, अरुण गौतमे, नरेंद्र परदेशी, आशु यादव, नीलेश दुधलम, विनोद पाटील, संतोष लोढे, सावंत मेजर, शिरीष पुसेगावकर आदी उपस्थित होते. अशी केली निवड उपक्रमासाठी महागरातील विविध शाळा व सामाजिक संस्थांकडून गरजू विद्यार्थ्यांची नावे मागविण्यात आली होती. पारदर्शक प्रक्रियेद्वारे पात्र विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले. दररोज लांब अंतर पायी चालत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकलमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. शिवजयंतीचा संदेश कृतीतून साकार करणारा हा उपक्रम सामाजिक जाणिवेचे प्रतीक ठरला.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart