ज्योत घेऊन जाणाऱ्यांचे आळेफाटा येथे स्वागत

आळेफाटा, ता. १९ : आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरातील आळे, वडगाव आनंद, राजुरी, उंचखडक, बोरी बुद्रुक, साळवाडी, जाधववाडी, भोरवाडी, वडगाव कांदळी या गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांतून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
आळेफाटा येथील ‘श्री हरी ओम ग्रुप’च्या वतीने मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती फुलांची आकर्षक सजावट व चौकात मंदिरासारखी भव्य कमान उभी करून रंगीबेरंगी फुलांची आरास आणि विद्युत रोषणाई केली होती. शिवनेरी किल्ल्यावरून ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांचे स्वागत आळेफाटा मुख्य चौकात श्री हरी ओम ग्रुपच्या वतीने केले. त्यांना नाश्त्याची व्यवस्था केली होती.
दरम्यान, राजुरी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माता यांच्या वेशभूषा केल्या होत्या. विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढून ‘जय भवानी- जय शिवाजी’ अशा घोषणा देण्यात आल्या. शाळेमध्ये शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करून विद्यार्थ्यांची भाषणे या वेळी झाली.

function fbPixel () { if (fired) return; fired = true;

!function(f,b,e,v,n,t,s){ if(f.fbq) return; n=f.fbq=function(){ n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments) }; if(!f._fbq) f._fbq=n; n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0'; n.queue=[]; t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v; s=b.getElementsByTagName(e)[0]; s.parentNode.insertBefore(t,s); }(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');

fbq('init', '131893666558789'); fbq('track', 'PageView'); }

function trigger() { fbPixel(); cleanup(); }

function cleanup() { window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.removeEventListener('keydown', trigger); }

var passiveOpts = { passive: true, once: true };

// fire on first meaningful interaction window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.addEventListener('keydown', trigger, { once: true });

// safety fallback (user never interacts) setTimeout(fbPixel, 15000); })();

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart