चिपळूण-भाजपाच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी प्रशांत यादव

भाजपाच्या दक्षिण रत्नागिरी
जिल्हाध्यक्षपदी प्रशांत यादव
चिपळूण, ता. : येथील भाजपचे नेते प्रशांत यादव यांची रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यादव यांच्या निवडीचे पत्र जाहीर केले.
भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पालिका निवडणुकीवेळी पदाचा राजीनामा दिला होता. चव्हाण यांनी तो मंजूर केल्यानंतर मागील काही दिवस जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. या पदावर कोणाची वर्णी लागेल, याची सर्वांनाच उत्सुकता होती. यादव यांनी पालिका निवडणुकीत तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रभावीपणे कामगिरी केली.
चिपळूण पालिकेत भाजपचे नगरसेवक वाढले. देवरूख नगरपंचायत ही महायुतीकडे आली. रत्नागिरी जिल्हा परिषदेत चिपळूण तालुक्यातून भाजपचे प्रथमच दोन सदस्य आणि चिपळूण पंचायत समितीमध्ये तीन निवडून आले. देवरूख नगरपंचायतीमध्येही भाजपचे कमल फुलले. यासाठी यादव यांचे योगदान मोठे होते. संघटनात्मक रचनेमधील त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांची दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदासाठी निवड घोषित केली.

function fbPixel () { if (fired) return; fired = true;

!function(f,b,e,v,n,t,s){ if(f.fbq) return; n=f.fbq=function(){ n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments) }; if(!f._fbq) f._fbq=n; n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0'; n.queue=[]; t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v; s=b.getElementsByTagName(e)[0]; s.parentNode.insertBefore(t,s); }(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');

fbq('init', '131893666558789'); fbq('track', 'PageView'); }

function trigger() { fbPixel(); cleanup(); }

function cleanup() { window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.removeEventListener('keydown', trigger); }

var passiveOpts = { passive: true, once: true };

// fire on first meaningful interaction window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.addEventListener('keydown', trigger, { once: true });

// safety fallback (user never interacts) setTimeout(fbPixel, 15000); })();

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart