चाकण, ता. १९ : येथील औद्योगिकदृष्ट्या जागतिक पातळीवर महत्त्वाच्या असलेल्या चाकण (ता. खेड) औद्योगिक वसाहत परिसरात दररोज हजारो ट्रक, ट्रेलर, बस, कंटेनरची ये- जा सुरू असते. मात्र, अनेक वाहनांची योग्य देखभाल न झाल्यामुळे ती मार्गावरच बंद पडतात. त्यामुळे मुख्य चौक, तसेच औद्योगिक वसाहतींकडे जाणारे रस्ते ठप्प होतात.
चाकण येथील औद्योगिक परिसरात अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. येथील उत्पादने देश- विदेशात पाठवले जातात. त्यामुळे वाहतुकीची सततची कोंडी अनेक उद्योगांनाही आर्थिक फटका देत आहे. कच्चा माल, उत्पादित माल वेळेत पोहोचत नसल्याने उद्योग, कंपन्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच, रुग्णवाहिका आपत्कालीन सेवांनाही या वाहतूक कोंडीचा मोठा अडथळा निर्माण होत आहे.
कंपनीतील कामगार कंपनीत वेळेवर कामावर पोहचत नाहीत. वाहतूक तज्ज्ञांच्या मते अवजड वाहनांची नियमित तांत्रिक तपासणी, तसेच फिटनेस प्रमाणपत्रांची काटेकोर अंमलबजावणी झाली, तर अशा घटना मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात. वाहनमालकांनी वेळोवेळी वाहनांच्या सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. तसेच, कागदपत्रे अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे.
नियमभंग करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी, प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्त कारवाई करून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. पण ही कारवाई सातत्याने होत नाही. चाकणमधील प्रमुख पुणे- नाशिक महामार्ग, चाकण- तळेगाव, चाकण- शिक्रापूर मार्गावर अवजड वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबवली पाहिजे. बंद पडलेल्या वाहनांना तत्काळ हटवण्यासाठी क्रेन उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे वाहतूक पोलिस विभाग, तसेच चाकणमधील औद्योगिक संघटनांनी क्रेन उपलब्ध करणे गरजेचे आहे. अवजड वाहने बंद पडल्यानंतर क्रेन येण्यास अगदी एक- दोन तास लागतात. त्यामुळे वाहतूक ठप्प होते.
function fbPixel () { if (fired) return; fired = true;
!function(f,b,e,v,n,t,s){ if(f.fbq) return; n=f.fbq=function(){ n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments) }; if(!f._fbq) f._fbq=n; n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0'; n.queue=[]; t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v; s=b.getElementsByTagName(e)[0]; s.parentNode.insertBefore(t,s); }(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');
fbq('init', '131893666558789'); fbq('track', 'PageView'); }
function trigger() { fbPixel(); cleanup(); }
function cleanup() { window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.removeEventListener('keydown', trigger); }
var passiveOpts = { passive: true, once: true };
// fire on first meaningful interaction window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.addEventListener('keydown', trigger, { once: true });
// safety fallback (user never interacts) setTimeout(fbPixel, 15000); })();