खुलताबाद परिसरात रमजानचा उत्साह शिगेला:उद्यापासून रोजांना होणार, प्रारंभ तरावीह नमाज आणि कुरआन पठणाला विशेष महत्त्व

खुलताबाद परिसरात रमजानचा उत्साह शिगेला:उद्यापासून रोजांना होणार, प्रारंभ तरावीह नमाज आणि कुरआन पठणाला विशेष महत्त्व
मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होत असून, ऐतिहासिक खुलताबाद शहरासह संपूर्ण तालुक्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. महिनाभर चालणाऱ्या उपवासांसाठी (रोजा) मुस्लिम समाजाने जय्यत तयारी केली असून, लहान बालकांपासून ते थेट वयोवृद्धांपर्यंत सर्वांमध्ये रमजानच्या स्वागताचा उत्साह दिसून येत आहे. खुलताबाद शहराला ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला असून शहरात ५० पेक्षा अधिक मशिदी आहेत. रमजानच्या पूर्वसंध्येला सर्व मशिदींची विशेष स्वच्छता करण्यात आली असून, आकर्षक विद्युत रोषणाईने मशिदी सजवण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी प्रकाशाने न्हालेल्या मशिदी शहराच्या सौंदर्यात भर घालत असून, संपूर्ण परिसरात मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. नमाज पठण, तरावीह नमाज आणि धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन पूर्ण झाले आहे. उपवास, संयम आणि आत्मशुद्धीचा पवित्र महिना रमजान महिन्यात मुस्लिम बांधव पहाटे ‘सहरी’ करून उपवासाला सुरुवात करतात आणि सायंकाळी सूर्यास्तानंतर ‘इफ्तार’ करून उपवास सोडतात. हा महिना केवळ उपवासाचा नसून संयम, आत्मसंयम, दानधर्म आणि अल्लाहची इबादत करण्याचा काळ मानला जातो. विशेष म्हणजे मुस्लिम समाजात पाच वर्षांपासूनच लहान मुलेही पालकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण उपवास ठेवण्याचा प्रयत्न करतात. तरुण, महिला तसेच वयोवृद्धही श्रद्धेने उपवास पाळतात. रमजान महिन्यात रात्री मशिदींमध्ये विशेष ‘तरावीह’ नमाज अदा केली जाते. सामाजिक सलोखा आणि प्रशासनाची तयारी रमजान महिन्याच्या निमित्ताने नेहमीप्रमाणे हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडत आहे. धार्मिक सलोखा आणि शांततेचे वातावरण कायम असून, मशिदींच्या परिसरात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने पाणीपुरवठा, स्वच्छता आणि प्रकाश व्यवस्थेवर लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart