
प्रतिनिधी | खंडाळा वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी गुरुवार रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांच्या सह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायतच्या कॉम्प्लेक्स प्रांगनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आपल्या भाषणातुन प्रकाश टाकला. याप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संजय निकम, पंचायत समिती सदस्य हुसेन शेख, राजाराम बागुल, अॅड.कैलास पवार, आजम बाबा, विजय मगर, दिनकर मगर,संजय मगर,अर्जुन मगर,राजेंद्र नवले, प्रकाश वाघचौरे, शिवराज पैठणकर, महेश जगदाळे, रमेश जेजुरकर, गोरखनाथ शिंदे, अरुण जाधव, संजय जेजुरकर, सुभाष मगर, ज्ञानेश्वर मगर, सतीश बागुल, भिमराव खंडीझोड, शफिक शेखसह ग्रामस्थ उपस्थित होते.