कोळोशी-हडपीड शाळेच्या
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १९ ः ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी यांच्यामार्फत आयोजित ज्ञानज्योत शिष्यवृत्ती माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपीडमधील सहा विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.
दरवर्षी जिल्ह्यातील १५० हून अधिक होतकरू विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती वितरित केली जाते. कोळोशी हडपीड हायस्कूलमधील मंजुळा वरक, वेदिका घाडी, पार्थ गुरव, आयुष तावडे, समर्थ राणे व जान्हवी सावंत या विद्यार्थ्यांना ही ज्ञानज्योत शिष्यवृत्ती देण्यात आली. त्याबद्दल संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालकांनी ग्लोबल फाउंडेशनचे व्यवस्थापक प्रसाद परब व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.