कळंबोलीत अनधिकृत बॅनरवर धडक कारवाई;
कळंबोलीत अनधिकृत बॅनरवर धडक कारवाई
पनवेल, ता. १८ (बातमीदार) : पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’ अंतर्गत कळंबोली परिसरात अनधिकृत बॅनरवर अतिक्रमण पथकाने धडक कारवाई केली. मार्बल मार्केट ते खांदा कॉलनी पुलादरम्यानच्या मुख्य महामार्गावर लावण्यात आलेल्या सुमारे ४० ते ५० बेकायदेशीर फलक पथकामार्फत हटविण्यात आले आहे.
आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार प्रभाग आयुक्त तथा सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर आणि प्रभारी अधीक्षक राजेश डोंगरे यांच्यामार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मुख्य रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरातींमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच शहराच्या सौंदर्यावरही विपरीत परिणाम होत असल्याने प्रशासनाने तातडीने कारवाईचा निर्णय घेतला. अतिक्रमण विभागाच्या पथकाने सकाळपासून मोहीम हाती घेत संबंधित बॅनर काढून टाकले. दरम्यान, परवानगीशिवाय कोणतेही बॅनर, फलक किंवा जाहिरात फलक लावल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पुढील काळातही अशीच मोहीम सातत्याने राबवून शहरातील अनधिकृत जाहिरातींवर आळा घालण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
function fbPixel () {
if (fired) return;
fired = true;
!function(f,b,e,v,n,t,s){
if(f.fbq) return;
n=f.fbq=function(){
n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments)
};
if(!f._fbq) f._fbq=n;
n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0';
n.queue=[];
t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v;
s=b.getElementsByTagName(e)[0];
s.parentNode.insertBefore(t,s);
}(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');
fbq('init', '131893666558789');
fbq('track', 'PageView');
}
function trigger() {
fbPixel();
cleanup();
}
function cleanup() {
window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('keydown', trigger);
}
var passiveOpts = { passive: true, once: true };
// fire on first meaningful interaction
window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.addEventListener('keydown', trigger, { once: true });
// safety fallback (user never interacts)
setTimeout(fbPixel, 15000);
})();