ओतूर येथे चित्रकला स्पर्धा

ओतूर, ता. २० ः ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्रामविकास मंडळ संचलित चैतन्य विद्यालय व समर्थ ऑनलाइनच ड्रॉईंग क्लासेस पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त शिवकालीन प्रसंगावर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ३७५ विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गटात सहभाग घेतला होता, अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी दिली.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण ग्रामविकास मंडळ ओतूरचे अध्यक्ष अनिल तांबे, साहाय्यक पोलिस निरीक्षक लहुजी थाटे, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य रमेश शिरसाठ, समर्थ क्रिएशनचे संस्थापक सचिन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सुप्रभात बाळासाहेब साबळे हिच्या चित्राची सर्व मुलांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून निवड करण्यात आली. यावेळी सायकल देऊन तिचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी रघुनाथ तांबे, राजेंद्र डुंबरे, आत्माराम जाधव, प्रकाश डुंबरे, शांताराम पानसरे, राजश्री भालेकर, सोनल डुंबरे, दिलीप काळे, सचिन ढमाले, चैत्राली धिरडे, जनार्दन खामकर, नितीन डुंबरे, राजेंद्र भनगडे, नीलेश तांबे आदी उपस्थित होते.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी चैतन्य विद्यालयाचे कला विभाग प्रमुख संतोष सोनवणे, बाळासाहेब साबळे, समर्थ ड्रॉइंग क्लास पुण्याचे संचालक सचिन जाधव, आशा गाडेकर, सोनाली कांबळे व ईश्वर ढमाले यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद खेत्री व प्रास्ताविक बाळासाहेब साबळे यांनी केले. सचिन जाधव यांनी आभार मानले.

function fbPixel () { if (fired) return; fired = true;

!function(f,b,e,v,n,t,s){ if(f.fbq) return; n=f.fbq=function(){ n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments) }; if(!f._fbq) f._fbq=n; n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0'; n.queue=[]; t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v; s=b.getElementsByTagName(e)[0]; s.parentNode.insertBefore(t,s); }(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');

fbq('init', '131893666558789'); fbq('track', 'PageView'); }

function trigger() { fbPixel(); cleanup(); }

function cleanup() { window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.removeEventListener('keydown', trigger); }

var passiveOpts = { passive: true, once: true };

// fire on first meaningful interaction window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.addEventListener('keydown', trigger, { once: true });

// safety fallback (user never interacts) setTimeout(fbPixel, 15000); })();

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart