एंजल वन एएमसीने सिल्‍व्‍हर ईटीएफ, एफओएफ केले लाँच:वाढत्या चांदीच्या महत्त्वामुळे गुंतवणूकदारांना नवा पर्याय

एंजल वन एएमसीने सिल्‍व्‍हर ईटीएफ, एफओएफ केले लाँच:वाढत्या चांदीच्या महत्त्वामुळे गुंतवणूकदारांना नवा पर्याय
एंजल वन अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने (एंजल वन एएमसी) एंजल वन सिल्‍व्‍हर ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) आणि एंजल वन सिल्‍व्‍हर ईटीएफ एफओएफ (फंड ऑफ फंड्स) लाँच करण्याची घोषणा केली आहे. या न्यू फंड ऑफर्स (NFO) ९ फेब्रुवारी २०२६ पासून गुंतवणुकीसाठी खुल्या झाल्या आहेत. ईटीएफसाठी एनएफओ १९ फेब्रुवारी २०२६ रोजी बंद होईल, तर एफओएफसाठी एनएफओ २३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरू राहील. चांदीला मौल्यवान धातू आणि औद्योगिक वस्तू अशा दोन्ही भूमिकांमुळे महत्त्व प्राप्त होत आहे. सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने आणि डेटा सेंटर्सकडून वाढती मागणी, तसेच मर्यादित पुरवठा यामुळे गुंतवणूकदारांचा कल चांदीकडे वाढत आहे. जागतिक स्तरावर चांदीची मागणी वाढत असून, ती भविष्यातही कायम राहण्याची शक्यता आहे. या वाढत्या ट्रेंडला एएमएफआय (AMFI) डेटाने दुजोरा दिला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये भारतात सिल्‍व्‍हर ईटीएफ एयूएमने (ॲसेट अंडर मॅनेजमेंट) ७२,००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ३१ जानेवारी २०२६ रोजी संपलेल्या गेल्या १० वर्षांच्या कालावधीत चांदीने (रुपयांमध्ये) २५.८ टक्के सीएजीआर (कंपाउंड ॲन्युअल ग्रोथ रेट) दराने वाढ नोंदवली आहे. यामुळे पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी आणि महागाईच्या काळातही उत्तम फायदे देण्याची चांदीची क्षमता दिसून येते. या लाँचबाबत बोलताना एंजल वन एएमसीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व सीईओ हेमेन भाटिया म्हणाले, “गुंतवणूकदार झपाट्याने बदलत असलेल्या जगानुसार आपला पोर्टफोलिओ बदलत आहेत. अशा परिस्थितीत विविधतेसाठी आणि स्थिरतेसाठी चांदीमधील गुंतवणुकीला प्राधान्य दिले जात आहे. आमच्या सिल्‍व्‍हर ईटीएफ आणि सिल्‍व्‍वर एफओएफच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना या गतिमान मालमत्ता वर्गाच्या दीर्घकालीन क्षमतेमध्ये सहभागी होण्यासाठी सोपा, पारदर्शक आणि किफायतशीर मार्ग उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे.”

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart