उंडाळे. शेतकऱ्यांची मोठी दानत, 40 टनांवरील उसाच्या ऊपन्नाची रक्कम मंदिर जीर्णोद्धारा साठी दान

उंडाळ्यात शेतकऱ्याचे अनोखे दातृत्व

शेतातील उसाच्या जादा उत्पन्नाची रक्कम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी

जगन्नाथ माळी ः सकाळ वृत्तसेवा
उंडाळे, ता. १८ ः शेतकऱ्याचं मन मोठं असतं, हे आपल्या कृतीतून उंडाळे येथील शेतकऱ्याच्या कृतीने दिसून आले आहे. येथील दिलीप पांडुरंग पाटील यांनी आपल्या शेतात अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळालेल्या उसाच्या पिकातील रक्कम गावातील ज्योतिर्लिंग मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दिली आहे.
येथील प्रगतशील शेतकरी दिलीप पाटील यांनी त्यांच्या ३२ गुंठे क्षेत्रात उसाची लागवड केली होती. त्यामध्ये साधारण ४० टन उत्पन्न निघेल, असा त्यांचा अंदाज होता. त्यांनी मनोमन एक संकल्प केला होता. ४० टनांपेक्षा अधिक उत्पन्न झाल्यास त्यातून मिळणारी अतिरिक्त रक्कम गावातील ज्योतिर्लिंग मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी द्यायची.
नशिबाने आणि परिश्रमाच्या बळावर उसाचे उत्पन्न ४० टनांहून अधिक निघाले. संकल्पाप्रमाणे अतिरिक्त उत्पन्नातून मिळालेली तब्बल १२ हजार ४६८ रुपयांची रक्कम त्यांनी आनंदाने मंदिर समितीकडे सुपूर्द केली.
देवासाठी दिलेली रक्कम किती आहे, यापेक्षा देण्याची भावना किती मोठी आहे, हे त्यांच्या कृतीतून स्पष्ट झाले. त्यांच्या या अनपेक्षित उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. यातून त्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. शेतकऱ्याच्या या उदात्त कृतीमुळे ‘दान देण्यात मोठेपणा नसतो, तर मनाच्या श्रीमंतीत असतो,’ हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

—————————

दिलीप पाटील
00824
—————————-

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart