आत्मविश्वास, निसर्गसेवेतून कर्करोगावर मात:कर्करोग जनजागृती यात्रेत मानद वन्यजीव अभ्यासक बाळ काळणे यांचा संदेश‎

आत्मविश्वास, निसर्गसेवेतून कर्करोगावर मात:कर्करोग जनजागृती यात्रेत मानद वन्यजीव अभ्यासक बाळ काळणे यांचा संदेश‎
प्रतिनिधी | अकोला यावर्षी ८ ते १४ फेब्रुवारीदरम्यान अहिल्यानगर ते कोकण विभागात कर्करोग जनजागृती यात्रा काढण्यात आली. यात अकोला येथील मानद वन्यजीव अभ्यासक व कर्करोगावर मात केलेले बाळ काळणे यांनी आत्मविश्वास, समाजाची सेवा आणि निसर्गाच्या सेवेतून कर्करोगावर मात करता येते, असा संदेश दिला. कार्य व निसर्ग सेवा करताना कर्करोगामुळे शारिरीक व मानसिक स्थितीवर झालेले परिणाम विसरण्यास मदत होते. निसर्ग सेवेमुळे कर्करोगाचा विसर पडतो, निसर्गातून आनंद मिळतो, हा आनंद कर्करोगावर उपचारात प्रभावी ठरतो. बाळ काळणे म्हणाले की, मी कर्करोगावर मात केल्यानंतर सर्पसेवा, वन्यजीव सेवा आणि आपत्कालीन सेवा सक्षमपणे पार पाडत आहे. कर्करोगावर मात केल्यानंतर पोहणे, आसने करणे, स्कुबा डायव्हिंग आदी धाडसी प्रकार आव्हानांवर मात करण्याची जिद्द निर्माण करतात. आतापर्यंत त्यांनी मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि यावर्षी कोकण विभागात पाचवी कर्करोग प्रबोधन यात्रा पूर्ण केली आहे. दरवर्षीच्या प्रबोधन यात्रेत ते जिल्हा व तालुका पातळीवरील मेडिकल कॉलेज, महाविद्यालये, जिल्हा परिषद, केंद्रीय कारागृह, पोलिस विभाग, लायन्स क्लब, रोटरी क्लब, डॉक्टरांच्या संघटना, आदिवासी भाग, खुला नागरिक मंच आदी ठिकाणी आयोजक सूचवतील त्याप्रमाणे कार्यक्रम घेण्यात येतात. दरवर्षीच्या प्रबोधन यात्रेत प्रसार माध्यमे, आकाशवाणी मुलाखती आणि प्रत्यक्षात लोकांसमोर मार्गदर्शनाच्या माध्यमातून बाळ काळणे यांची ही कर्करोग जनजागृती झाली आहे. कर्करुग्णांतून योद्धा कर्करोगाच्या दोन शस्त्रक्रियांमुळे त्यांना ७९ टक्के दिव्यांगत्व आले आहे. तरीही निसर्ग सेवा, समाजसेवा, धाडसी जीवनशैली व सकारात्मक विचारांच्या माध्यमातून कर्करोग प्रबोधन यात्रा व व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी लाखो लोकांपर्यंत पोहोचून कर्करोग जागृतीचे कार्य ते करत आहेत. त्यांनी दोनशेवर कार्यक्रम व व्याख्यान करत कर्करोगाबाबत जागृत करत पीडितांना धीर दिला आहे. कर्करोग पीडितांच्या प्रत्यक्ष भेटी घेत ते त्यांना रुग्ण ते ‘कर्करोग योद्धा’ घडवत आहेत. आरोग्य सेवेतील त्यांची ही सेवा राज्यात उल्लेखनीय ठरत आहे.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart