Wednesday, March 18, 2026
HomeNewsMartahiआज शिवरायांची 396 वी जयंती:किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय...

आज शिवरायांची 396 वी जयंती:किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय शिवजन्मोत्सवाचा सोहळा

आज शिवरायांची 396 वी जयंती:किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय शिवजन्मोत्सवाचा सोहळा
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९६ वी जयंती राज्यभरात अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावात साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर पहाटेपासूनच शिवभक्तांची मांदियाळी जमली असून ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला आहे. शिवनेरीवरील मुख्य शासकीय सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबतच पर्यटनमंत्री शंभुराज देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार आणि इतर अनेक मान्यवर महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवनेरीवर पोहोचत आहेत. मान्यवरांच्या हस्ते पाळणा सोहळा आणि विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. शिवजयंतीचे औचित्य साधून किल्ले शिवनेरीवर आणि विशेषतः शिवजन्म स्थळाच्या आतील भागात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. गडाला ऐतिहासिक वारसा जपून विद्युत रोषणाईने उजळवून टाकण्यात आले आहे. या मंगलमयी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि जन्मस्थळावर नतमस्तक होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त गडावर दाखल झाले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल केवळ शिवनेरीवरच नव्हे, तर मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण भारतात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी भव्य मिरवणुका, पोवाडे, मर्दानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांच्या शौर्याचा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध व्याख्याने आणि रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments