आंतरराष्ट्रीय रंगमंचावर शरण्या वाघमोडेची सुवर्णकामगिरी

आंतरराष्ट्रीय रंगमंचावर शरण्या वाघमोडेची सुवर्णकामगिरी
ऑनलाइन इंटरनॅशनल परफॉर्मिंग आर्ट्स स्पर्धेत प्रथम क्रमांक; जिंदल विद्यामंदिरचा लौकिक उंचावला
मुरुड, ता. १९ (बातमीदार) : मुरूड तालुक्यातील साळाव येथील जिंदल विद्यामंदिरातील इयत्ता पाचवीत शिकणारी शरण्या वाघमोडे हिने जानेवारी २०२६ मध्ये पार पडलेल्या ऑनलाइन ‘इंटरनॅशनल परफॉर्मिंग आर्टस् कॉन्टेस्ट अ‍ॅण्ड फेस्टिव्हल’मध्ये प्रथम क्रमांक पटकावत शाळेचा सन्मान वाढवला आहे. नागपूर येथील अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघामार्फत तसेच पॅरिस (फ्रान्स) मान्यताप्राप्त या प्रतिष्ठित स्पर्धेत तिने नृत्य व नाटिकेचे उत्कृष्ट सादरीकरण केले. शिस्तबद्धता, सर्जनशील अभिव्यक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने हा मानाचा बहुमान मिळवला.
या यशामुळे जिंदल विद्यामंदिराची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. प्राचार्य मुकेश ठाकूर यांनी शरण्याच्या जिद्द, परिश्रम आणि चिकाटीचे कौतुक करत तिचे अभिनंदन केले. एसएमसी अध्यक्ष पंकज मलिक व उपप्राचार्य मंगेश बामनोटे यांनीही तिच्या कामगिरीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व कलागुणांना व्यासपीठ देण्याच्या शाळेच्या ध्येयधोरणाचे हे यश प्रतीक ठरले आहे.

function fbPixel () { if (fired) return; fired = true;

!function(f,b,e,v,n,t,s){ if(f.fbq) return; n=f.fbq=function(){ n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments) }; if(!f._fbq) f._fbq=n; n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0'; n.queue=[]; t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v; s=b.getElementsByTagName(e)[0]; s.parentNode.insertBefore(t,s); }(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');

fbq('init', '131893666558789'); fbq('track', 'PageView'); }

function trigger() { fbPixel(); cleanup(); }

function cleanup() { window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.removeEventListener('keydown', trigger); }

var passiveOpts = { passive: true, once: true };

// fire on first meaningful interaction window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.addEventListener('keydown', trigger, { once: true });

// safety fallback (user never interacts) setTimeout(fbPixel, 15000); })();

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart