अभिनव शिवजन्मोत्सव:240 हिरकणींनी नऊवारी साडी नेसून‎ अनुभवला रॉक क्लाइम्बिंगचा थरार‎; छत्रपती सेनेतर्फे पोवाडे, नृत्य, ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा‎

अभिनव शिवजन्मोत्सव:240 हिरकणींनी नऊवारी साडी नेसून‎ अनुभवला रॉक क्लाइम्बिंगचा थरार‎; छत्रपती सेनेतर्फे पोवाडे, नृत्य, ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा‎

आईच्या प्रेमाचे आणि धाडसाचे‎ अद्भुत उदाहरण म्हणजे हिरकणी. ‎‎रायगडाच्या इतिहासात हिरकणीचे‎नाव अजरामर आहे. गडाच्या ‎‎कड्यावरून खोल दरीत उतरत‎ आपल्या लेकरासाठी उतरणारी ही‎माता आजही प्रत्येकासाठी‎ प्रेरणास्थान आहे. याच परंपरेला ‎साजेसी ‘हिरकणी’ ही स्पर्ध

.

सीबीएसजवळील छत्रपती शिवाजी ‎महाराज स्मारकात (शिवतीर्थ) ही ‎स्पर्धा पार पडली,‎ भाजप आमदार‎ देवयानी फरांदे,‎ कल्याण-डोंबिवलीच्या महापौर‎ हर्षाली थविल आणि माजी खासदार ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎हेमंत गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत‎ स्पर्धेचे उद्घाटन झाले. सकाळी‎ हिरकणी स्पर्धा पार पडल्यानंतर‎ सायंकाळी महिलांसाठी विशेष‎ सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन‎ करण्यात आले होते. यामध्ये छत्रपती‎ शिवाजी महाराज आणि राजमाता‎ जिजाऊ यांच्या जीवनावरील पोवाडे,‎ नृत्य आणि ऐतिहासिक वेशभूषा‎ स्पर्धेने उपस्थितांची मने जिंकली.‎ महिलांच्या अंगभूत कलागुणांना वाव‎ देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात ‎आल्याची माहिती छत्रपती सेनेच्या‎पदाधिकाऱ्यांनी दिली.‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎याप्रसंगी छत्रपती सेनेचे संस्थापक‎अध्यक्ष चेतन शेलार, कार्याध्यक्ष‎निलेश शेलार, शिवजन्मोत्सव समिती‎अध्यक्ष शिल्पा सोनार, कोअर टीम‎अध्यक्ष जयद्रथ थविल, प्रदेशाध्यक्ष‎राजेश पवार यांच्यासह नागरिक‎मोठ्या संख्येने उपस्थित होते.‎

दरम्यान, छत्रपती सेनेतर्फे‎ गुरुवारी (दि.‎१९) शिवजन्मोत्सवाचा सोहळा‎आयोजित करण्यात आला आहे.‎सायंकाळी बक्षीस वितरण समारंभ‎होणार आहे. या सोहळ्याला मोठ्या‎संख्यने उपस्थित राहावे, असे आवाहन‎संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.‎

हिरकणी स्पर्धेतील विविध वयोगटांतील विजेत्या स्पर्धक‎

१८ ते २५ वर्षे वयोगट : वेदिका‎सोनवणे (प्रथम), गायत्री पाटील‎(द्वितीय), प्रिया गायकवाड (तृतीय)‎ २६ ते ३५ वर्षे वयोगट : अनुजा‎भिरूड (प्रथम), प्रतीक्षा अहिरे‎(द्वितीय)‎ ३६ ते ४५ वयोगट : अश्विनी‎कोठावदे (प्रथम), सपना फुलानी‎(द्वितीय), दीप्ती गायकवाड (तृतीय)‎ उत्तेजनार्थ : सुरेखा मैंद, जया‎पाटील, संगीता भामरे, वैशाली चित्ते,‎सुवर्णा बनकर आणि सविता तारवते.‎

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart