राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला. अशातच आता अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी मोठी मागणी केली आहे. जय पवार यांनी या अपघात प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीला विमानाचे उड्डाण करण्यास तात्काळ बंदी घालावी आणि या कंपनीच्या गैरव्यवहारांची चौकशी झाली पाहिजे अशी देखील मागणी केली.
जय पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, ‘विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही. महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे. व्हीएसआर कंपनीला तात्काळ उड्डाणे चालविण्यास बंदी घालून, त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे, मिस यू डॅड’