अक्कलकोटमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी, सायंकाळी पाळणा कार्यक्रमास हजारो महिला उपस्थित, नयनरम्य फटाक्यांची आतिषबाजी

AKK26B05883
अक्कलकोट : येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले व इतर महिला.

अक्कलकोटमध्ये ‘जय भवानी’, ‘जय शिवराय’चा जयघोष
………..
शामियाना मंडपात छत्रपती शिवरायांची प्राणप्रतिष्ठापना

अक्कलकोट, ता. २० : ‘जय भवानी’, ‘जय शिवराय’ च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्यावतीने जुना राजवाडा समोरील शामियाना मंडपात मंगलमय वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी विद्युत रोषणाई, फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर फुलून गेला होता.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आधारस्तंभ जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे व अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, युवक मंडळाचे मार्गदर्शक सुरेशचंद्र सूर्यवंशी, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्‍यामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, उत्सव अध्यक्ष आकाश शिंदे यांच्या हस्ते अन्नछत्र मंडळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे पूजन करून मिरवणुकीने जुना राजवाडा समोरील शामियाना मंडपात मूर्ती स्थापन करण्यात आली.
याप्रसंगी पुरोहित सोमकांत कुलकर्णी यांच्या मंत्र पठणाने विधीवत पूजन करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता प्रतिष्ठापना व पाळणा कार्यक्रम जुना राजवाडा समोरील शामियाना मंडपात छत्रपती शिवरायांच्या सिंहासनारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थाच्या संस्थापिका अध्यक्षा व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या विश्वस्ता अलकाताई जनमेजयराजे भोसले, सचिवा-अर्पिताराजे अमोलराजे भोसले, मैंदर्गीच्या नगराध्यक्षा अंजली बाजारमठ, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, हिरकणी महिला बहु. संस्था सदस्या सरोजनी मोरे यांच्यासह तालुक्यातील वळसंग, शिरवळ, कुरनूर, वागदरी, काळेगाव चुंगी येथील महिला मंडळासह सखी ग्रुप, वीरशैव महिला मंडळ, जिजाऊ सखी मंच यांच्यासह शहरातील विविध महिला मंडळ भगिनींच्या हस्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी महिला मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व सोमकांत कुलकर्णी यांच्या मंत्र पठणाने विधीवत पूजन करण्यात आले.

चौकट
शहरातील प्रमुख मार्गावरून आज मिरवणूक
शहरातील प्रमुख मार्गावरून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart