Pune Crime News : पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी IAS अधिकाऱ्याच्या घरात दरोडा, 43 लाख 50 हजार

Written by

Pune Crime News : पुणे शहरात सर्वत्रच दिवाळी उत्साहात साजरी होत असतानाच एक दरोड्याची बातमी समोर आली आहे. पुण्यात मुंढवा परिसरात राहणार्‍या महसूल विभागातील एका सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकार्‍याच्या घरात चोरी झाली आहे. चोरटयांनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच रात्री साडेआकरा वाजण्याच्या दरम्यान लक्ष्मीपूजनामध्ये ठेवलेले तब्बल 150 तोळे सोन्याचे दागिने आणि अडीच लाख रूपये असा एकूण 43 लाख 50 हजार रूपयाचा ऐवज लंपास केला आहे.
याप्रकरणी दत्तात्रय संभाजी डोईफोडे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डोईफोडे हे महसूल विभागातून निवृत्त झाले आहेत. त्यांचे चिरंजीव सागर दत्तात्रय डोईफोडे हे आयएएस अधिकारी असून सध्या त्यांची नेमणूक जम्मू-काश्मीरमध्ये आहे. गुरूवारी लक्ष्मी पूजन असल्याने दत्तात्रय डोईफोडे यांनी घरातील जवळपास सर्वच पारंपारिक दागिने पूजनामध्ये ठेवले होते. त्यामध्ये मंगळसूत्र, नेकलेस, मोहनमाळ, बांगडया, तोडे, ब्रेसलेट, पाटल्या तसेच हिर्‍याचे सेट आणि रोख रक्कम 2 लाख 50 हजार रूपयांचा समावेश होता. एकुण 150 तोळे वजनाचे दागिने आणि 2 लाख 50 हजार रूपये रोख असा एकूण 43 लाख 50 हजार रूपयांचा ऐवज पूजामध्ये ठेवण्यात आला होता.
डोईफोडे यांचे घर गुरूवारी रात्री 11.30 ते शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान कुलूप लावून बंद होते. त्यावेळी चोरटे बंगल्याचे गेटचे कुलूप तोडून व हॉलचे खिडकीचा गज कापून आत प्रवेश केला. आणि पूजनामधील सर्व दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 43 लाख 50 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. मुंढवा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि गुन्हे शाखेचे अधिकारी चोरटयांचा शोध घेत आहेत…
जेव्हा ही चोरी झाली तेव्हा घरातील सगळे लोक झोपेत होते..
जेव्हा ही चोरी झाली तेव्हा घरामध्ये एकूण आठ जण होते.  त्यामध्ये दोन घरात काम करणारी नोकर सुद्धा होते. परंतु ते देखील गार झोपलेले होते. चोर चोरी करून गेल्यानंतर त्या ठिकाणी फक्त त्यांच्या पायातील चपला सोडून गेले आहेत. श्वानपथक ला देखील या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे.  पथक देखील घटनास्थळी दाखल झालं आणि अजूनही या चोरट्यांचा शोध सुरू आहे.

Article Categories:
News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares