पुण्यात काय सुरू काय बंद पहा एका क्लिकवर

Written by

Latest Marathi News | लोकमत / Lokmat Marathi Newspaper | Live Marathi Batmya | ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com

पुणे: राज्य सरकारच्या नियमावलीच्या आधारे आता पुणे महापालिकेने नवीन निर्बंध लागू केले आहेत.त्यानुसार पुणे शहरामध्ये आधीच्या आदेशाप्रमाणे सहा वाजताच सगळे बंद होणार आहे. फक्त सुरू करण्याची वेळ मात्र ६  ऐवजी ७ वाजता सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्याचे आदेशही महापालिकेने काढले आहेत.
परवानगी घेण्यात आलेल्या सर्व आस्थापनांमध्ये तसेच सेवा पुरवणाऱ्या लोकांची ‘आरटीपीसीआर’चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. दर पंधरा दिवसाला ही चाचणी करायची आहे. तसेच त्यांचे लसीकरण करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. शहरात नेमके काय सुरू राहणार आणि काय बंद हे पाहूयात.

 हे राहणार सुरू:
* अत्यावश्यक सेवा-
*रुग्णालये डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक ,वैद्यकीय ,विमा कार्यालय ,फार्मसी फार्मासिटिकल कंपनी आणि इतर वैद्यकीय तसेच आरोग्य सेवा
* किराणा दुकाने भाजीपाला डेअरी बेकरी मिठाई आणि खाद्यपदार्थांचे दुकाने
* अत्यावश्यक सेवेसाठी बस सुविधा.
*टॅक्सी ,रिक्षा, रेल्वे. रिक्षामधून प्रवास करताना वाहन चालक आणि दोन व्यक्तींना परवानगी तर टॅक्सीसाठी 50% आसन क्षमता.‌
* ई-कॉमर्स
* वर्तमानपत्रे
* बँका, दूरसंचार सेवा पुरवठादार, विमा कसेसेच मेडिक्लेम कंपन्या वकील सीए आणि वित्तीय संस्थेची संबंधीत कार्यालय, औषध उत्पादन करणाऱ्या आस्थापना आणि त्यांच्याशी संबंधित उत्पादक यांची कार्यालये.
* पार्सल सेवा सोमवार ते शुक्रवार मध्ये सकाळी सात ते सायंकाळी सहा ‌ या दरम्यान. तर शुक्रवार ते रविवार यादरम्यान फक्त होम डिलिव्हरी ला परवानगी राहील.
* उत्पादन क्षेत्र
* ऑक्सिजन प्रोड्युसर कंपन्या
* बांधकाम कर्मचाऱ्यांची निवासी सोय
* डे केअर.

हे बंद राहणार:
* सर्व उद्याने ,मैदाने , सोमवार ते शुक्रवार सायंकाळी सहा ते सकाळी सातपर्यंत तर शुक्रवार ते रविवार या कालावधीत पूर्णपणे बंद राहणार
* सर्व प्रकारची दुकाने, मार्केट आणि मॉल.
* सर्व खासगी कार्यालये.
*सिनेमागृह, नाट्यगृह, जिम क्लब स्विमिंग पूल आणि क्रीडा संकुल.
* हॉटेल रेस्टॉरंट बार, फूड कोर्ट हे बंद राहणार
* सर्व धार्मिक स्थळे
* ब्युटी पार्लर सलून स्पा आणि केशकर्तनालय.
* प्राथमिक माध्यमिक शाळा महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था पूर्णपणे बंद होतील. ऑनलाईन शिक्षण आणि दहावी बारावी परीक्षेला परवानगी
* पाचपेक्षा जास्त रुग्ण सापडलेल्या सोसायटीला ‘मायक्रो कंटेनमेंट झोन’ जाहीर करून तिथे बाहेरील व्यक्तीला प्रवेश बंद.

Article Categories:
News · Braking News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares