20 नोव्हेंबरला अमित शाह पुणे दौऱ्यावर

Written by

१९ नोव्हेंबर २०२२
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 20 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर असणार आहे. कै.पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून नऱ्हे, आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. 20 नोव्हेंबरला सकाळी 11.30 वाजता हा सोहळा पार पडणार आहे. शिवसृष्टीची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी स्थापन केलेल्या महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान या संस्थेचे विश्वस्त जगदीश कदम यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.
अमित शाहांबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा हे नेते उपस्थित असणार असल्याची माहिती कदम यांनी दिली आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares