१२ डिसेंबर २०२२
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा नेते चंद्रकांत पाटलांवरील शाईफेक प्रकरणावर भाष्य केलं आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, माझ्याविरोधात ठाण्यात कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल झाला तेव्हाच लक्षात घ्यायला हवं होतं की, महाराष्ट्रात आता खोटे गुन्हे दाखल करण्याची परंपरा सुरू झाली आहे. पोलिसांच्या हातात काहीच राहिलेलं नाही. वरून आदेश येतात आणि गुन्हे दाखल होतात.
मी वकिलांशी बोललो आहे. ३०७ च्या कोणत्याही व्याख्येत किंवा संज्ञेत शाईफेकीचा गुन्हा बसतच नाही. आपल्या गावरान भाषेत खूनाचा प्रयत्न म्हणजे कलम ३०७ आहे. हा प्रकार ३२३ मध्येही बसू शकत नाही. उलट यांनी समाजाला पेटवण्याचं काम केलं आहे, महाराष्ट्रात आग लावण्याचं काम केलं आहे. सरकारने मोठेपणा दाखवून हे गुन्हे ताबोडतोब मागे घ्यावेत,अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली.
Article Tags:
news