११२ पोलिस निवासस्थानांच्या इमारतीचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Written by

प्रसन्न तरडे
बातमी प्रतिनिधी
०६ एप्रिल २०२२
शिर्डी
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलिस स्टेशन आणि शिर्डी येथील ११२ पोलिस निवासस्थानांच्या इमारतीचे उद्घाटन शिर्डी येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या वास्तूंचे गुणवत्तापूर्ण बांधकाम केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व कल्याण महामंडळासह सर्व यंत्रणांचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अभिनंदन केले. राज्यातील पोलिसांना अशी सुसज्ज निवासस्थाने मिळाली, तर पोलिसांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. ज्यामुळे महाराष्ट्र पोलिसांचा नावलौकिक व दरारा वाढेल असा विश्वास पोलिस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला वाटतो, असे गृहमंत्री म्हणाले.

 
आपल्या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राहील, अवैध धंदे कसे बंद होतील आणि पोलिस ठाण्याचा कारभार कसा पारदर्शक होईल आणि सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल, याकडे पोलिसांनी अधिकाधिक लक्ष द्यावे. सरकार पोलिस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तुम्हाला सर्व प्रकारची मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण पोलिसांनी देखील सरकारचे प्रतिनिधी म्हणून तळागाळात सरकारची प्रतिमा उंचावण्यासाठी पारदर्शक पद्धतीने काम केले पाहिजे, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares