१९ डिसेंबर २०२२
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरून सध्या दोन्हीकडील वातावरण चांगलच तापलं आहे. त्यातंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटवरून वाद निर्माण झालाय. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरून वादग्रस्त ट्विट करण्यात आले परंतु, दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र हे ट्विट बसवराज बोम्मई यांनी केले नाही असे म्हटले आहेत. यावरूनच आता जयंत पाटील यांनी ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांना टॅग करत हे ट्विट नक्की कोणी केले आहे? याचा निकाल द्यावा असे म्हटले आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. एलन मस्क आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून वरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे ?असं जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. @elonmusk , आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून वरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे ? https://t.co/bmTMkjTOkv
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) December 19, 2022

Article Tags:
news