२२ डिसेंबर २०२२
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरुन सभागृहात वातावरण तापले आहे. भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी विधानसभेत बोलताना हा मुद्दा उपस्थित केला. यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर ट्विट करत निशाणा साधला आहे.
रोहित पवार म्हणाले की, जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी सत्ताधारी आमदारच पायऱ्यांवर आंदोलन करताना आणि सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडताना दिसत आहे. हेच का ‘जनसामान्यांचं’ भरकटलेलं दिशाहीन सरकार? सत्ता चालवता येत नसल्याचे विरोधात जाण्याचीच ही त्यांची तयारी दिसतेय.
Your email address will not be published.
Article Tags:
news