हेंमत गोडसे मच्छर आहे, संजय राऊतांची टीका

Written by

१५ डिसेंबर २०२२
मागील महिन्यात नाशिकमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना गोडसे यांनी राऊतांनी माझ्यासमोर नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान दिले होते. या आव्हानाला बुधवारी (दि. १४) उत्तर देताना संजय राऊत यांनी गोडसेंवर टीका करताना गोडसे छोटा मच्छर आहे. तो गटारात वाहून जाईल, अशा शब्दांत गोडसेंची हीनवणी केली.
नाशिक येथे खासगी दौऱ्यावर आलेल्या राऊतांनी नाशिकमधील कोणताही शिवसैनिक हा गोडसेंचा पराभव करून त्याचे डिपॉझिट जप्त करू शकतो, असा दावा केला. नाशिक शहरात ठाकरे गटात कोणतीही गटबाजी नसल्याचे सांगत गट येतात आणि वाहूनही जातात, अशा शब्दांत पक्षात सुरू असलेल्या वादविवादावर टिप्पणी केली. लोकसभेची उमेदवारी करंजकर यांना देणार का या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, जिल्हाप्रमुख हा सेनापती असतो. त्याला कुणाशी कसे लढायचे याची माहिती असते. नाशिक लोकसभेतून करंजकरच काय सुनील बागूल, भाऊसाहेब चौधरी, दत्ता गायकवाड, मुशीर सय्यद आणि साधा शिवसैनिकही गोडसेंचा पराभव करू शकतो, असा विश्वास व्यक्त केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत गोडसेंना मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यांसह शिवसेनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही विरोध होता. असे असताना केवळ विद्यमान खासदार म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आली. गोडसे मातोश्रीवर आले आणि चुका दुरुस्त करू, असे आश्वासन दिल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा खुलासा राऊत यांनी केला.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares