स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण ची अनोखी कामगिरी

Written by

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०१ जून २०२२
नारायणगाव
दि ९ मार्च २०२२ रोजी कावळ पिंपरी (ता. जुन्नर) येथील रोहिदास पाबळे याचा जुन्या भांडणाचा राग मनात धरून दत्ता भाकरे व त्याच्या सोबतच्या इतर साथीदारांनी मिळून रात्रीच्या वेळी अचानक हल्ला चढवून व गावठी पिस्तुलातून गोळीबार करून तसेच धारदार शस्त्रांनी वार करून खून केला होता. या गुन्ह्यातील एकूण पाच आरोपी व एक विधी संघर्ष म्हणजेच अल्पवयीन बालक यास यापुर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार आरोपी दिलीप रामा आटोळे ( वय ४४ रा कावळपिंप्री, ता जुन्नर जि पुणे ) मुळ रा मोहाडी धुळे हा गुन्हा घडल्यापासून सतत आपला ठावठिकाणा बदलून वेगवेगळ्या राज्यांमध्ये वास्तव्य करत होता. ३१ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिलीप आटोळे हा त्याच्या पत्नीसह करंजाडे, पनवेल येथे असल्या बाबतची माहिती गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळाली.
त्यानुसार या ठिकाणी जाऊन दिलीप आटोळे याचा शोध घेतला असता सदर ठिकाणी दिलीप रामा आटोळे हा सापडल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याला पुढील तपास साठी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. या आरोपीवर यापूर्वी देखील खुन , खंडणी ,मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
कावळ पिंपरी येथील रोहिदास पाबळे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डाँ अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश गट्टे, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शन खाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, पो. उपनिरिक्शक गणेश जगदाळे, सहायक फौजदार तुषार पंदारे, हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन, मंगेश थिगळे, दगडू विरकर यांनी केली आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares