२४ डिसेंबर २०२२
फिफा विश्वचषक २०२२ मध्ये अर्जेंटिनाला चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका बजावणारा कर्णधार लिओनेल मेस्सीचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. भारतातही त्यांची लोकप्रियता खूप आहे. नुकतेच अर्जेंटिनाच्या कर्णधाराने जय शाहला एक खास भेट दिली आहे, या भेटवस्तूचा फोटो आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आणि माजी खेळाडू प्रज्ञान ओझाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
लिओनेल मेस्सीने बीसीसीआय सचिव जय शाह यांना आपली स्वाक्षरी केलेली जर्सी भेट दिली आहे. जय शाहसोबतच्या या जर्सीचा फोटो पोस्ट करत प्रज्ञान ओझाने लिहिले, GOAT ने जय भाईसाठी शुभेच्छा आणि स्वाक्षरी असलेली मॅच जर्सी पाठवली आहे! किती नम्र व्यक्तिमत्व. मलाही अशी एखादी अशी एक जर्सी मिळेल अशी आशा आहे… लवकरच.
Your email address will not be published.
Article Tags:
news