कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
१९ एप्रिल २०२२
ओतूर
ओतूर येथील सोमनाथ शांताराम घोलप (वय ३७) रा.ओतूर (ता.जुन्नर) हे दि.०९/०४/२०२२ रोजी पहाटे ५ वा.सुमारास घरात कोणालाही काही एक न सांगता निघून गेले आहेत, त्यांची पत्नी सुनीता यांनी याबाबत ओतूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून बेपत्ता व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे, केस काळे, नाक सरळ,अंगात चॉकलेटी रंगाचा शर्ट,काळ्या रंगांची पॅट, पायात काळी चप्पल,उंची ५ फूट अशा वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास त्वरित ओतूर पोलीस स्टेशन अथवा मो नं ९११९४४१५८९ वर संपर्क करावा असे ओतूर पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.याबाबतचा अधिक तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुकुंद मोरे हे करीत आहेत.
Your email address will not be published. Required fields are marked *
Article Tags:
news