सोनभाऊ गावडे वि. का. से. स. सोसा. मर्या; म्हसे बु ll ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

Written by

सोनभाऊ गावडे वि. का. से. स. सोसा. मर्या. म्हसे बु ॥ येथील सन २०२२ – २७ ची निवडणूक प्रकीया, शुक्रवार दि. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी शिरूर येथिल नविन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील, सहाय्यक निबंधक सह. कार्यालय शिरूर येथे पार पडली.
ही निवडणूक बिनविरोध पार पडली असून त्यासाठी, शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे व घोडगंगा सह. सा. कारखान्याचे संचालक राजेंद्र पोपटराव गावडे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सोनभाऊ मुसळे व ग्रामस्थांनी सांगितले.
बिनविरोध निवड झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे :
१- सोनभाऊ विठ्ठल मुसळे
२-हनुमंत भागुजी वायसे
3- संदीप मारूती मुसळे
४- चंद्रकांत रामभाऊ गावडे
५- गणपत जबाजी खाडे
६_ मुरलीधर गोविंद पवार
७- शिवाजी खंडू नरसाळे
८- प्रकाश विठोबा खाडे
महिला प्रतीनिधी :
१ – जिजाबाई अंकुश गोसावी
२ – धनाबाई धोंडीबा मुसळे
भटक्या विमुक्त जाती/जमाती प्रतिनिधी :
१ – पांडूरंग म्हतारबा मुसळे
ईतर मागास प्रवर्ग :
१- संदीप दत्तात्रय गायकवाड
या निवडणूक प्रकीयेमध्ये गावातील कोंडीभाऊ खाडे, विठ्ठल खाडे, दादाभाऊ मुसळे, गोविंद मुसळे, रामभाऊ गावडे, सुरेश मुसळे, पोपट मुसळे, सबाजी चोरे, मोहन चाटे, किसन दुडे आदींनी मनाचा मोठेपणा दाखवत, गावची बिनविरोध परंपरा कायम राखली आहे. त्यामुळे म्हसे बु ll गावाने बेट भागात आदर्श निर्माण केल्याने, जिल्हा परीषद सदस्या श्रीमती सुनिताताई गावडे यांनी या सर्व गावकारभाऱ्यांचे अभिनंदन केलेय.ही निवडणूक प्रक्रिया, तालुका सहकारी निवडणूक अधिकारी एस एस कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली, निवडणूक निर्णय अधिकारी पी बी पिसाळ यांनी पार पाडली.

Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares