सीमावादावर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच दिवशी भूमिका स्पष्ट केली, आशिष शेलार यांचं स्पष्टीकरण

Written by

१२ डिसेंबर २०२२
कर्नाटकचे मुख्यमंत्री बेळगाव तसेच महाराष्ट्रातील इतर गावांबाबत सातत्याने वक्तव्य करत असताना महाराष्ट्र सरकार शांत का बसलंय? केंद्रात भाजप सरकार असूनही महाराष्ट्रातील शिंदे-भाजप महायुतीचं सरकार मूग गिळून का बसलंय, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येतोय. त्याला आज मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं.
आशिष शेलार म्हणाले, आदित्य ठाकरे सामना सोडून काही वाचत नसतील किंवा बाकीची भाषा त्यांना कळत नसेल. देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच दिवशी भूमिका स्पष्ट केली होती. कर्नाटकने हे सगळं प्रकरण शांततेने आणि संयमाने घेतलं पाहिजे. अन्यथा आरेला कारेचं उत्तर मिळेल.आमचा दावा ज्या गावांवर आहे, तो १००% सर्वोच्च न्यायालयात देखील मांडला आहे, पुढे नेला आहे. त्या ठिकाणाहून जी वक्तव्य झाली त्या संदर्भात स्वतः अमित शहा देखील बोलले आहेत. तरीही अशी वक्तव्ये होत असल्याचं आशिष शेलार म्हणाले.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares