सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारून तरुणाला केले जखमी

Written by

१२ नोव्हेंबर २०२२
पिंपरी
रात्रपाळीसाठी कामावर जात असलेल्या तरुणाला रस्त्यात अडवून त्याच्याकडे पैसे आणि मोबाईलची मागणी केली . मात्र , ते देण्यास नकार दिल्याने तुटलेल्या काचेच्या बाटलीने पोटात व पाठीत मारले तसेच सिमेंटचा ब्लॉक डोक्यांत मारून गंभीर जखमी केले . याप्रकरणी अनोळखी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला . मोरेवस्ती चिखली येथे सोमवारी दि . ७ रात्री पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
तुळशीराम भार्गव जाधव वय ५० रा . मोरेवस्ती , चिखली , मूळ रा . कमलनी खुर्द , ता . खेड , जि . रत्नागिरी यांनी याप्रकरणी बुधवारी दि . ९ चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा मुलगा रसिक हा रात्रपाळी ड्युटीसाठी बसने कामावर जाण्यासाठी घरातून चालत जात होता . त्यावेळी तेथे उभे असलेल्या चार आरोपीपैकी एका आरोपीने रसिक याला थांबवले . त्यानंतर आरोपीने रसिक याचे खिसे तपासले . तुझ्याजवळ किती पैसे आहेत ते मला दे , तुझा मोबाईल मला दे ,असे आरोपी रसिक याला म्हणाला.
माझ्याकडे पैसे आणि मोबाईल नाही , असे रसिक याने सांगितले . त्यानंतर आरोपीने त्याच्या इतर तीन साथीदारांना बोलावून घेतले . त्या चौघांनी पुन्हा पैशांची मागणी केली . माझ्याकडे पैसे नाहीत , असे फिर्यादीचा मुलगा रसिक याने सांगितले . त्यानंतर आरोपींनी तुटलेल्या काचेच्या बाटलीने त्याच्या पोटात व पाठीत मारून तसेच रस्त्यावरील सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारून रसिक याला गंभीर जखमी केले.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares